“पूर्वीचे सुलतान मंदीरं पाडायचे आणि आताचे सुलतान शिवसेना पाडत आहेत”

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी काही समर्थक आमदारांना सोबत घेत सुरत गाठलं. त्यानंतर एक एक करत 40 आमदार शिंदे गटात सामील झाले.

एकनाथ शिंदेंचं बंड आमदारांपूरतं न राहाता त्यात आजीमाजी नगरसेवक व जिल्हाध्यक्ष देखील सामील झाले. शिवसेनेला सुरूंग लागलेलं असताना आता शिवसेनेच्या खासदारांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आहे.

आमदारांप्रमाणे शिवसेनेचे दोन तृतीयांश खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. खासदार फोडल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत असून सुलतान असा उल्लेख करत शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्रावर सध्या सुलतानी संकट आहे. पूर्वीचे सुलतान मंदीरं पाडायचे आणि आताचे सुलतान शिवसेना पाडत आहेत, असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे.

स्वत:ला शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी का जातात?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. तर दिल्लीला मोदी-शहांच्या पायांवर त्यांनी शिवसेना खासदारांचा नजराणा पेश केला आहे, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही. मात्र, हा स्वाभिमान मंत्र यावेळी तर दिल्लीने मोडून दाखवला, असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नवाब मलिकांना दिलासा नाहीच, ईडीचा मलिकांना आणखी एक झटका

“प्रलोभनाला आम्ही कुत्र्यासारखे टांग वर करून दाखवतो अन् दबावाला…”

उद्धव ठाकरेंबाबत खासदार राहुल शेवाळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

उद्धव ठाकरे आक्रमक; भाजपला दिला ‘हा’ गंभीर इशारा

शिंदे गटाकडून झाली मोठी चूक; लोकसभा सचिवालयाने दिला महत्त्वाचा सल्ला