‘शरद पवारांवर आरोप करून केसरकरांनी स्वत:च्याच बनियनमध्ये खळबळ माजवली’, शिवसेनेचा घणाघात

मुंबई | 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना व भाजपची युती तुटली. युती तुटल्यापासून या दोन्ही पक्षांमध्ये जुंपलेली पाहायला मिळत असताना एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर हा वाद अधिकच चिघळला.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 समर्थक आमदारांना सोबत घेत बंड केलं. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकार पाडलं व शिंदे सरकार राज्यात सत्तेत आलं.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला आणि विशेषत: उद्धव ठाकरेंना घेरण्याचं काम केलं. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला.

शिवसेनेत आतापर्यंत जेवढे बंड झाले आहेत त्यामागे शरद पवारांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केसरकरांनी केला. केसरकरांच्या या आरोपांना आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

फुटीर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे व भाजपातील राणे गटाचे भांडे आत्ताच खडखडू लागले आहेत, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. तर सावंतवाडीच्या केसरकरांनी शरद पवारांवर शिवसेना फोडल्याचा आरोप करून स्वत:च्याच बनियनमध्ये खळबळ माजवली आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे.

केसरकर खाल्ल्या घरचे वासे मोजणारे आहेत, असा घणाघात देखील सामनातून करण्यात आला आहे. तर केसरकरांचा राजकीय प्रवास देखील तेच सांगत असल्याचा टोलाही शिवसेनेने लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन 15 दिवस उलटले आहेत मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यावरून देखील शिवसेनेनं शिंदे सरकारला फैलावर घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे सुष्मिता सेन पुन्हा चर्चेत, दोघांची संपत्ती ऐकून थक्क व्हाल

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती

देवेंद्र फडणवीस आज राज ठाकरेंची भेट घेणार, ‘या’ मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा होणार?

राज्यात पावसाचा जोर ओसरणार मात्र दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या केसरकरांना अजित पवारांचा प्रेमाचा सल्ला, म्हणाले…