“शिवसेनेसोबतच्या युतीआधी भाजप काय होता कुणाला माहिती नाही?”

मुंबई | अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून देणगी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाला देणगी दिलेल्या पावतीचा फोटोही त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षासाठी देणगी देण्याचं आवाहन केलं आहे. भाजपच्या या मोहिमेवरून शिवसेनेने भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.

जगातील सर्वात श्रीमंत पक्षाला देणगी दिल्याने देश बलाढ्य होणार असा दावा जो पंतप्रधानांनी केलाय त्याचा काडीमात्र संबंध नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

भाजपवर देणग्या गोळा करून चूल पेटवण्याची वेळ अद्याप तरी आलेली नाही. भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्ष असावा, असा खोचक टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

भाजप सत्तेत नव्हता तेव्हा शेठजीचा पक्ष अशीच त्याची ओळख राजकारणात होती. ही ओळख शिवसेनेची मैत्री झाल्यावर पुसली गेली. अयोध्या आंदोलनाने जोर धरल्यावर भाजप लोकांपर्यंत पोहोचला, असा चिमटा देखील शिवसेनेने काढला आहे.

“महाराष्ट्रात शिवसेनेशी युती झाल्यावर भाजप लोकांपर्यंत पोहोचला. त्याआधी भाजप काय होता हे काय कुणाला माहिती नाही?,” असा घणाघात देखील शिवसेनेने भाजपवर केला आहे.

भाजपचे नाव श्रीमंतांच्या यादीत झळकले. तरीही भाजप आता लोकांकडून पाच रूपयांपासून एक हजार रूपयांपर्यंत देणग्या घेण्याचे मायाजाल टाकले आहे. म्हणजे आपला पक्ष लोक वर्गणीवर उभा आहे हे त्यांना दाखवायचे आहे, अशी टीका देखील शिवसेनेने केली आहे.

भाजपच्या श्रीमंतीचे टोक किती उंचावर गेले आहे ते अयोध्येत भाजप परिवारांतील प्रमुख लोकांनी केलेल्या जमीन खरेदीवरून काल दिसले, असा टोलादेखील शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपला लगावण्यात आला आहे.

भाजपची ही अशी श्रीमंती ओसंडून वाहत असताना विशेष देणगी मोहीम राबविण्याचे प्रयोजन काय?, असा सवाल देखील शिवसेनेने उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

वयाने 12 वर्षे मोठ्या मलायकाला डेट करत असल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना अर्जुनने फटकारलं

‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोना, वेळीच व्हा सावध!

विशाल निकम ठरला ‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता; ट्रॉफीसह जिंकले ‘इतके’ लाख

“…तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो”

नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न केले जातायेत – नारायण राणे