मुख्यमंत्र्यांचा बाप काढल्याने शिवसेना आक्रमक; शेलारांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन

मुंबई |  भाजप नेते आशिष शेलार यांच्या विरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतीये. आज डोंबिवलीत शिवसेनेने शेलारांविरोधात जोडेमारो आंदोलन केलं. यावेळी आशिष शेलार मुर्दाबाद… आशिष शेलार हाय हाय… अशा घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणादून सोडला होता.

आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली होती. CAA हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे काय……  तुझ्या बापाचं राज्य आहे काय?, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली होती.

यापुढे आशिष शेवार महाराष्ट्रात जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल, असं शिवसेना नेते सचिन अहिर यांनी सांगितलं.

दरम्यान, मी कुणाचाही एकेरी उल्लेख केला नाही. मुख्यमंत्री महोदयांचा तर नाहीच नाही. पण जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, असं शेलार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘या’ भाजप नेत्याने नोटबंदीवरून पंतप्रधानांवर उठवली टीकेची झोड

-…म्हणून मी पंकजाला एक पत्र लिहिलं; उद्धव ठाकरेंचा खुलासा

-महात्मा गांधींना शिव्या घालणारे रावणाची औलाद; काँग्रेसकडून भाजपचा समाचार

-मुनगंटीवारांनी गायलं शिवसेनेसाठी ‘हे’ खास गाणं…!

-भाजपला राजकीय पटलावर आणखी एक धक्का; यवतमाळ विधानपरिषद ही गेली भाजपच्या हातातून