कपीलभाई तुम्हाला पैशाची गरज नसेल पण इतरांना आहे; भारत पाक मालिका खेळण्यावरून शोएबचा टोला

नवी दिल्ली |  कोरोनामुळे सध्या खेळाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा फटका बसतो आहे. अशातच यातून सावरण्यासाठी भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेटचे 3 सामने खेळवून त्यांच्यातील निधी गरजेचा ठरेल, असा पर्याय पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने ठेवला होता. मात्र कपील देव यांनी त्या पर्यायावर फुली मारली. त्यानंतर आता शोएब अख्तरने त्यांना टोला लगावला आहे.

मला काय म्हणायचं आहे हे कपिल भाईंना समजलंच नाही. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आता सर्व मुद्दे बाजूला ठेवून पैसा कसा निर्माण होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. कदाचित कपील भाईंना पैशांची गरज नसेल पण इतरांना ती नक्कीच आहे, असा टोला शोएबने लगावला आहे.

जगभरातील क्रिकेटप्रेमी हे सामने पाहण्यासाठी टिव्हीला चिकटून बसतील यात काहीच शंका नाही. माझ्या मते मी सुचवलेल्या पर्यायावर भविष्यात नक्कीच विचार होईल, असा आशावादही त्याने यावेळी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी निधीसाठी क्रिकेट खेळवण्याची गरज नाही, भारताकडे पैसा आहे, असं म्हणत विरोध दर्शवला होता.

महत्वाच्या बातम्या –

-अमेरिकेत कोरोना व्हायरसने घेतला 20 हजार जणांचा बळी

-“मजुरांनी गावाकडं जाण्याचा प्रयत्न करु नये, त्यांची सर्व व्यवस्था केली जाईल”

-चंद्रकांत पाटलांविरोधात राष्ट्रवादी युवकची ‘उघडा डोळे बघा नीट’ मोहिम!

-पुण्यात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू, मृतांची संख्या 31 वर

-दादा, कोरोनाचा धोका साठीच्या वरील लोकांना जास्त उद्भवतो, काळजी घ्या- जयंत पाटील