अमेरिकेत कोरोना व्हायरसने घेतला 20 हजार जणांचा बळी

नवी दिल्ली | कोरोनासमोर अमेरिकेने अक्षरश: टेकले आहेत. कोरोना व्हायरसने आमेरिकेत आतापर्यंत तब्बल 20 हजार जणांचा बळी घेतला आहे. तर जवळपास साडे चार लाख लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. न्यूयॉर्कमधल्या 1 लाख 80 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तिथल्याच 8600 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

जर्सीमध्ये 58  हजार जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, 2100 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत मागील काही दिवसांपासून जवळपास 1800 जणांना प्राण गमावावे लागत आहे. शुक्रवारी तब्बल 2 हजार जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.

दुसरीकडे युरोपमध्येही कोरोनाने तांडव माजवलं आहे. इटलीत 19 हजार 468 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दीड लाख जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्पेनमध्ये 1 लाख 63 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 16 हजार 600 जणांना प्राण गमवावे लागले आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“मजुरांनी गावाकडं जाण्याचा प्रयत्न करु नये, त्यांची सर्व व्यवस्था केली जाईल”

-चंद्रकांत पाटलांविरोधात राष्ट्रवादी युवकची ‘उघडा डोळे बघा नीट’ मोहिम!

-पुण्यात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू, मृतांची संख्या 31 वर

-दादा, कोरोनाचा धोका साठीच्या वरील लोकांना जास्त उद्भवतो, काळजी घ्या- जयंत पाटील

-राज्यात 134 नवे कोरोना रुग्ण; आकडा 1895 वर