उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार मारले गेल्याच्या घटनेची आठवण करून देत शिवसेनेचा भाजपवर घणाघात!

मुंबई| अलिबाग पोलिसांनी काल सकाळी लवकर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना ता.ब्यात घेतलं आहे. इंटेरिअर डिझाईनर अन्वय नाईक आ.त्मह.त्याप्रकरणी कलम 306 च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णब गोस्वामींला अ.टक केलं आहे.

अर्णव गोस्वामी यांच्या अ.टकेनंतर महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप करण्यात आले. माहाविकास आघाडीचं सरकार अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात सूड उगवत आहे, असा आरोप महाराष्ट्र सरकारवर करण्यात आला. मात्र, टीकाकारांना शिवसेनेचं मुखपत्र समजल्या जाणाऱ्या सामना मधून सडेतोड उत्तरे देण्यात आली आहेत.

अर्णव गोस्वामी याला एका खासगी प्रकरणातून अ.टक करण्यात आली आहे. त्याच्या अ.टकेचा संबंध राजकारणी आणि पत्रकारांशी नाही. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील काही महत्वाच्या राजकीय नेत्यांविरोधात अर्णव गोस्वामी यांनी चुकीचं वक्तव्य केलं यामुळे त्यांना अ.टक झाली, हे  म्हणणं पूर्णपणे चुकीचे आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

दोन वर्षांपूर्वी अलिबाग येथील रहिवासी अन्वय नाईक आणि त्याच्या आईने आ.त्मह.त्या केली होती. नाईक यांनी मृ.त्यू होण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात गोस्वामींनी केलेल्या आर्थिक फसवणूकीचा संदर्भ आहे. अर्णव गोस्वामी यांच्यामुळे आलेल्या मानसिक तणावामुळे नाईक आणि त्यांच्या आईने आ.त्मह.त्या केली. पण आधीच्या सरकारने गोस्वामीला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबले. यासाठी त्यांनी पोलिस व कोर्टावर दबाव आणला, असा आरोप सामनामधून शिवसेनेने भाजपवर केला आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी अर्णवला अ.टक करणे हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. ही अट.क म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असं अजिबात नाही. गुजरातमध्येही सरकारविरोधात लिखाण करणार्‍या संपादकांना अ.टक झाली आहे. उत्तर प्रदेशात आपत्कालीन परिस्थितीत पत्रकार मारले गेले, अशीही आठवण सामनामधून करून देत शिवसेनेने भाजपवर घणाघात केला आहे.

तसेच एका निष्पाप माणसाला आणि त्याच्या आईला आ.त्मह.त्या करण्यास भाग पाडले गेले. त्याची पत्नी न्यायासाठी प्रार्थना करीत आहे. आता पोलिसांनी कायद्याचे पालन केले आहे. त्यात चौथा खांब कोसळला? असे म्हणणारे लोकशाहीचा पहिला आधारस्तंभ उखडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असाही टोला शिवसेनेने लगावला आहे.

दरम्यान, अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडीओच्या इंटेरिअर डिझाईनचे काम केले होते. या कामाचे जवळपास नाईक यांना अर्णब गोस्वामी यांच्याकडून 5 कोटी 40 लाख रुपये येणे होते. मात्र, वारंवार पैसे मागूनही अर्णब गोस्वामी नाईक यांचे पैसे देत नव्हते. यामुळे अन्वय नाईक प्रचंड मानसिक तणावाखाली गेले होते.

यानंतर 5 मे 2018 रोजी नाईक यांनी अलिबाग जवळील काविर गावात त्यांच्या राहत्या घरी आ.त्मह.त्या केली. नाईक यांच्यानंतर त्यांच्या आईने देखील आ.त्मह.त्या केली होती. मात्र, आ.त्मह.त्या करण्यापूर्वी नाईक यांनी एक पत्र लिहून ठेवलं होतं.

या पत्रात अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी आपल्या कामाचे पैसे न दिल्यानं आपण आ.त्मह.त्या करत असल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी अन्वेय यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ बड्या अभिनेत्रीने स्वतःच्या वडिलांविषयीच केला धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…

अर्णव गोस्वामी यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नीलाही अ.टक होणार?

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या वकिलांनी केला ‘त्या’ प्रायव्हेट गोष्टीचा खुलासा

‘इथे तुमचे हातवारे चालणार नाहीत’; गोस्वामींना खडसावत न्यायाधिशांनी तब्बल 10 तासाने केली सुनावणी

सुशांत प्रकरणी ‘ती’ खेळी शरद पवारांचीच?; ‘सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनविण्यासाठी बेस तयार केला जातोय’