‘जो बायडन’ असतील अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष? पाकिस्तानला होणार ‘हा’ फायदा

वॉशिंग्टन | सध्या अमेरिका निवडणूक हीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. जो बायडन हे ‘डेमोक्रेटिक पार्टी’कडून निवडणूक लढवत आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प ‘रिपब्लिकन पार्टी’कडून निवडणूक लढवत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद मिळविण्यासाठी जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काटे की टक्कर पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये मतदान सुरु आहे. कोरोनाकाळात काही लोकांनी पत्राद्वारेच आपली मतं नोंदविली आहेत. तर काही लोकांनी मतदान केंद्रावर येवून मतं नोंदविली आहेत. टपालाद्वारे आलेल्या मतांमुळे सध्या मतमोजणी करण्यास उशीर लागत आहे.

अमेरिकेच्या 50 राज्यांपैकी 45 राज्यांची मतमोजणी झालेली आहे. तर पेन्सिलवेनिया, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा आणि विस्कॉन्सिन या राज्यांची मतमोजणी अद्याप बाकी आहे. सध्या झालेल्या मतमोजणीनुसार जो बायडन यांच्या पक्षाचे 253 उमेद्वार विजयी झाले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे 213 उमेद्वार विजयी झाले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद मिळविण्यासाठी आपल्या पक्षाचे 270 उमेद्वार निवडून आणणे गरजेचे असते. सध्या झालेल्या मतमोजणीनुसार जो बायडन यांच्याच पारड्यात जास्त मत आहेत. मात्र, निवडणुकीतील हा खेळ केव्हाही पलटू शकतो. यामुळे अमेरिका निवडणुकीच्या या निकालावर सर्वांचंच लक्ष लागून आहे. 12 नोव्हेंबर पर्यंत अंतिम निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जगातील इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानसाठी सुद्धा ही निवडणूक महत्वाची आहे. जो बायडन यांचं यश पाकिस्तानसाठी खूप महत्वाचं आहे. बायडन हे जुने पाकिस्तान समर्थक असल्याचं मानलं जात आहे.

2008 मध्ये जो बायडन यांना पाकिस्तानातील दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘हिलाल-ए-पाकिस्तान’ देण्यात आला आहे. यामुळे जो बायडन यांच्या विजयाने पाकिस्तानला नक्कीच फायदा होणार आहे. जो बायडन हे अमेरिकेतील त्या नेत्यांपैकी एक आहेत जे पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याचे समर्थन करतात.

दरम्यान, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाचा वा.द सध्या न्यायालयात पोहचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाने फिलोडेल्फियाच्या निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात खटला दाखल केला आहे. हा खटला फेडरल कोर्टात दाखल करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत राज्य कायद्याविरुद्ध घटनात्मक उल्लंघन करण्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार 5 वाजता या खटल्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या निवडणूक निकालाबरोबरच या खटल्याची सुनावणी देखील महत्वाची मानली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार मारले गेल्याच्या घटनेची आठवण करून देत शिवसेनेचा भाजपवर घणाघात!

‘या’ बड्या अभिनेत्रीने स्वतःच्या वडिलांविषयीच केला धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…

अर्णव गोस्वामी यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नीलाही अ.टक होणार?

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या वकिलांनी केला ‘त्या’ प्रायव्हेट गोष्टीचा खुलासा

‘इथे तुमचे हातवारे चालणार नाहीत’; गोस्वामींना खडसावत न्यायाधिशांनी तब्बल 10 तासाने केली सुनावणी