‘मी पाहिलं तेव्हा बिपीन रावत जिवंत होते…’; प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात एकूण 13 जणांचा जीव गेलाय. त्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधूलिका रावत, लेफ्टनंट हरजिंदरसिंह, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंह, जेडब्ल्यूओ दास, जेडब्ल्यूओ प्रदीप ए, हवालदार सतपाल, नाईक गुरसेवक सिंह, नाईक जितेंद्रकुमार, लान्स नाईक विवेककुमार, लान्स नाईक साई तेजा यांचा समावेश आहे. आता याअपघातासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलीये.

हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर काही नागरिक समोर आले होते जे घटनास्थळी लवकर पोहोचले होते. यापैकी एका प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक खुलासा केला.

प्रत्यक्षदर्शीने ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत दावा केलाय की, त्याने बिपीन रावत यांना पाहिलं होतं. पण तो त्यांना ओळखू शकला नाही. रावत हे दुर्घटनेनंतर गंभीर जखमी झाले होते आणि ते पाणी मागत होते, असा दावा त्या प्रत्यक्षदर्शीने केला आहे. या प्रत्यक्षदर्शीचं शिवकुमार असं नाव आहे.

मी सुरुवातीली हेलिकॉप्टरमधून पेट घेतलेले तीन माणसं खाली पडताना पाहिली होती. पण जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा दोन मृतदेह हे हेलिकॉप्टरच्या बाजूला पडलेले होते, असं शिवकुमारने सांगितलं.

आम्ही त्यांना सांगितलं की, सगळं ठीक होईल. काळजी करु नका. तेव्हा त्या व्यक्तीने आमच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. मात्र, आमच्याकडे तेव्हा त्यांना देण्यासाठी पिण्याचं पाणी नव्हतं. त्यानंतर एक टीम त्यांना घेऊन गेली. नंतर जेव्हा मला फोटो दाखवण्यात आला तेव्हा मला माहिती पडलं की, ते सीडीएस बिपीन रावत हे होते जे आमच्याकडून पणी मागत होते, असा दावा शिवकुमारने केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार?” 

‘मौका सभी को मिलता है…’; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा 

‘….हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे’; जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन 

“CDS बिपीन रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली”

अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर