‘से.क्स केल्यानंतरच तुला…’; दंगल चित्रपटातील ‘या’ बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीची पडद्याआड लपलेली काळी बाजू हळूहळू समोर येऊ लागली आहे. सुशांत प्रकारणानंतर अनेक अभिनेत्रींनी बॉलीवूडवर गंभीर आरोप केले आहेत. काही अभिनेत्रींनी बॉलिवूड मधील नेपो.टीजमविरुद्ध आवाज उठवला तर काही अभिनेत्रींनी इंडस्ट्रीत आपल्याबरोबर घडलेले अ.श्लील प्रकार सांगितले.

अशातच आता आणखी एका बड्या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी तिला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं याविषयी सांगितलं आहे. ‘दंगल’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या फतिमा सना शेख या अभिनेत्रीने नुकतंच एका मुलाखती दरम्यान आपल्या स्ट्रगल बद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

माझ्या जिवनात अशीही वेळ आली होती जेव्हा मला बोललं गेलं होतं की, तू जर से.क्स केला तरच तुला काम मिळेल. यामुळे माझ्या हातातून अनेकवेळा चित्रपटात काम करण्याच्या संधी निघून गेल्या आहेत. अनेकदा यामुळे मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आहे. काहीवेळा तर मला रिप्लेस देखील करण्यात आलं, असं फतिमाने म्हटलं आहे.

फातिमाने यावेळी तिच्या आयुष्यात घडलेल्या इतरही काही गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. मी ज्यावेळी अवघ्या 3 वर्षांची होते तेव्हा माझ्यासोबत छेडछाड झाली होती. महिलांसाठी हे फार मोठ्या डागासारखं असतं याविषयी मी केव्हाच बोलू शकत नव्हते, असाही खुलासा फतिमाने केला आहे.

तसेच आता जग बदललं आहे. आता लैं.गिक शो.षणाबद्दल या जगात जागरूकता फार वाढली आहे. काही काळापूर्वी या गोष्टींबद्दल न बोलण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र आता लोक जागरूक झाल्यामुळे यावर उघडपणे बोललं जाऊ लागलं आहे, असं फतिमाने मुलाखती दरम्यान म्हटलं आहे.

अभिनेत्री फतिमा दंगल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटातून तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली होती. दंगल चित्रपटानंतर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

फतिमाने बालकलाकार म्हणून देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत. फतिमा गेली 20 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत आहे.

दरम्यान, 2016 साली प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या दंगल या चित्रपटात फातिमाने अमीर खान सोबत काम केलं होतं. सध्या फतिमा आणखीही काही चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या दिवसात ती अभिनेत्री लुडो आणि सुरज पे मंगल भारी या चित्रपटांमध्ये दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! ‘या’ व्यक्तीने मुंबई पोलिसांवर धक्कादायक आरोप करत केला मोठा दावा

पब्जी लव्हर्ससाठी मोठी बातमी! भारत सरकारने पब्जी विषयी घेतला महत्वाचा निर्णय

सुशांत प्रकरणी एनसीबीचा धक्कादायक खुलासा! सुशांतच्या मृ.त्यूशी ‘या’ व्यक्तीचा संबंध असू शकतो

मुंबई इंडियन्सच्या टीमसह समर्थकांना मोठा झटका! मुंबईची टीम प्ले ऑफमध्ये नाही?

प्रेक्षकांना भुरळ घालणारी रेखाची ‘ती’ भूमिका आता श्रद्धा साकारतेय; वाचा सविस्तर