धक्कादायक! पोलिसाला गाडीतून उतरवून चोरांनी गाडी नेली चोरुन

लखनऊ | उत्तर प्रदेश पोलीस नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. उत्तर प्रदेश पोलिसांच्या अनेक वेगवेगळ्या कारनाम्यांच्या चर्चा सतत चालत असतात. अशातच आता उत्तर प्रदेश पोलिस आणखी एका गोष्टीमुळे पून्हा एकदा चर्चेत आले आहेत. पोलीस चोरांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करत असतात. मात्र आता चोरांनी पोलिसांच्याच गाडीवर हात साफ केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

उत्तर प्रदेश मधील ‘एसओजी’ ही सर्वात खास पोलीस फोर्स मानली जाते. ज्यावेळी उत्तर प्रदेश पोलिस एखाद्या गोष्टीचा शोध घेण्यात अयशस्वी ठरतात. त्यावेळी ही जबाबदारी एसओजी टीमकडे दिली जाते. एसओजीच्या टीमने कित्येकवेळा उत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू वाचवली देखील आहे.

याच एसओजीच्या एका टीमची गाडी चोरट्यांनी चोरल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. पोलिसांचीच गाडी चोरीला गेल्याच्या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांच्या कामावर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे उत्तर प्रदेश पोलीस संपूर्ण ताकदीने आपली गाडी शोधण्याच्या कामाला लागले आहेत.

देवरीया जिल्ह्यातील एसओजीच्या टीमने कोतवाली परिसरात आपली बलेरो गाडी उभी केली होती. या गाडीत एसओजीच्या टीमचा एक कर्मचारी देखील झोपला होता. हा कर्मचारी देवरीया जिल्ह्यात नवीन होता.

मध्यरात्री चोर गाडीपाशी आले आणि त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्याला उठून बाहेर झोपण्यास सांगितले. हे कोणीतरी एसओजीचेच सदस्य असतील, असं त्या पोलीस कर्मचाऱ्याला वाटलं. यामुळे तो देखील उठून दुसरीकडे जाऊन झोपला आणि मग हे चोर पोलिसांची गाडी घेऊन पळून गेले.

सध्या एसओजींच्या टीमने परिसरातील सर्व सीसीटीव्ही फोटेज चेक केले आहेत. मात्र, अद्याप गाडीचा काहीही सुगावा लागला नाही. एसओजीच्या गाडीत नेहमी ह.त्त्यारे असतात. अशी गाडी चोरी होणं हे उत्तर प्रदेश पोलिसांवर खूप मोठा दाग ठरत आहे

यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांना कसंही करून या गाडीचा शोध लावायचा आहे. मात्र, सध्या तरी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कामावर या घटनेमुळे अनेक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

वाह रे पठ्ठ्या! 1 लाख रुपये किलोची भाजी पिकवणाऱ्या भारतातील शेतकऱ्याविषयी नक्की वाचा

खुशखबर! अखेर गॅस सिलिंडरचे दर उतरले, जाणून घ्या नवीन दर

तो टॉयलेट सीटवर बसला असताना अचानक सीटमधून साप आला अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘उठ ना रे दादा’; बहिणीची आर्त हाक ऐकून मृ.त भाऊ झाला जिवंत, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या ‘या’ फोटोमुळे होतीय सोशल मीडियावर ट्रोल, पाहा व्हायरल फोटो