वाह रे पठ्ठ्या! 1 लाख रुपये किलोची भाजी पिकवणाऱ्या भारतातील शेतकऱ्याविषयी नक्की वाचा

पटणा | वाढत्या महागाईमुळे भाजीपाल्यांचे दर देखील वाढत चालले आहेत. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आपण घेणाऱ्या भाज्यांचे दर जास्तीत जास्त 100 रुपये किलोपर्यंत असू शकतात. मात्र, जर तुम्हाला असं म्हटलं की भारतात तब्बल 1 लाख रुपये किलोची एक भाजी पिकवली जाते तर? तुम्हालाही नवल वाटेल, होय ना?

भारतात एक तरुण तब्बल 1 लाख रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या एका भाजीचं उत्पन्न घेतो. ही भाजी जगातील सर्वात महाग भाजी म्हणून ओळखली जाते. चला तर मग जाणून घेऊयात या भाजीविषयी सविस्तर माहिती.

1 लाख रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या या भाजीचं नाव हॉप शुट्स असं आहे. पूर्वी हॉप शुट्सचा वापर केवळ औषधे तयार करण्यासाठी केला जायचा. मात्र, आता या हॉप शुट्सचा वापर भाजी म्हणून देखील केला जातो.

असं म्हटलं जातं की हॉप शुट्सचा उपयोग शरीरातील कॅन्सर सेल्स मा.रण्यासाठी केला जातो. ही भाजी कॅन्सर सेल्स मारण्यासाठी सर्वधिक उपयोगी आहे. हॉप शुट्सचा याच गुणधर्मामुळे ही भाजी एवढी महाग आहे.

बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील अमरेश सिंह नावाचा एक शेतकरी या भाजीचं उत्पादन करतो. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी अमरेश सिंह यांच्या या शेतीविषयी ट्विटर वरून माहिती दिली आणि बघता बघता अमरेश साहू यांची जगभर चार्चा सुरू झाली.

सुप्रिया साहू ट्विट करत म्हणाल्या की, हॉप-शूट्स ही जगातील सर्वात महागडी भाजी असून औरंगाबाद जिल्ह्यातील अमेरश सिंह हे या भाजीची शेती करतात. अशा प्रकारची शेती करणारे भारतातील ते पहिलेच शेतकरी आहेत. अशा प्रकारची शेती ही भारतीय शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरू शकते.

दरम्यान, हॉप शुट्स या भाजीच्या फुलाला हॉप कोन्स असे म्हणतात. हॉप कोन्सचा उपयोग बियर तयार करण्यासाठी केला जातो. तसेच या हॉप शुट्सचा फांद्यांचा उपयोग भाजी तयार करण्यासाठी केला जातो.

महत्वाच्या बातम्या-

खुशखबर! अखेर गॅस सिलिंडरचे दर उतरले, जाणून घ्या नवीन दर

तो टॉयलेट सीटवर बसला असताना अचानक सीटमधून साप आला अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘उठ ना रे दादा’; बहिणीची आर्त हाक ऐकून मृ.त भाऊ झाला जिवंत, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या ‘या’ फोटोमुळे होतीय सोशल मीडियावर ट्रोल, पाहा व्हायरल फोटो

थलैवा रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर