धक्कादायक! दाढी करताना वस्तारा लागला तरूणाच्या गळ्याला अन्…, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच प्रेरणा देणारे असतात.

तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. काही व्हिडीओ असे असतात की, त्यांना पाहून थेट अंगावरचा काटाच उभा राहिल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आपल्याला माहित आहे की, आजकाल कोणी घरात दाढी करत नाही. सगळेच पुरूष सलूनमध्ये जातात. ज्याप्रमाणे महिला दर महिन्याला पार्लमध्ये आपलं सौंदर्य आणखिण खुलवण्यासाठी जातात. अगदी त्याचप्रमाणे परूषही जात असतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण सलूनमध्ये दाढी करायला आला आहे. तो खुर्चीवर बसला असून, सलूनवाला त्याची दाढी करत आहे.

दाढी करता-करता सलून वाल्याकडून अचानक त्याच्या गळ्याला धारदार ब्लेड लागतं. त्यानंतर जखम झालेल्या ठिकाणाहून खूप रक्त येऊ लागत. काहीतरी ओलं लागत म्हणून तो तरूण आपले डोळे उघडून पाहतो, तर त्याला खूप रक्त दिसतं. हे पाहून तरूण त्या ठिकाणीच बेशुद्ध पडतो.

परंतू हा सगळा प्रकार खरा नसतो. म्हणजे त्या तरूणाला खरच लागलेलं नसून, सलूनवाल्यानं त्याच्यासोबत मस्करी केली असल्याचं समजतं आहे. तसेच ते रक्त नसून, ते लाल रंगाचं पाणी आहे. परंतू तो तरूण त्या लाल पाण्यालाच खरं रक्त समजून बसला.

https://www.instagram.com/p/CTtNaIPlLhj/?utm_source=ig_embed&ig_rid=b0586b61-13b2-46a2-8ba2-cb0277388b1d

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! स्वत:च्याच लग्नात नवरी गेली झोपी अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

आजी-नातीचा डान्सचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क तरूणाने दुचाकीलाच बनवलं चारचाकी, पाहा व्हिडीओ

“…म्हणून मला भारतात मुलाला जन्म देण्याची इच्छा नाही”

भररस्त्यात छेड काढल्यानं तरुणीला बेदम चोपलं, पाहा ‘डॅशिंग बॉयचा’ व्हिडीओ