“आताच बसलोय, परत या”, सोशल मीडियावर आज दिवसभर फक्त ‘या’ व्हिडीओचीच चर्चा

पुणे | पुणे मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट काढलं आणि पुणे मेट्रोचा (Pune metro) प्रवास करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले प्रवासी ठरले.

पुणे मेट्रो आता पुणेकरांसाठी खुली झाली आहे. त्यामुळे आता पुणेकर मेट्रो प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहे. अनेकांना मेट्रोतून प्रवास देखील केला आहे.

सध्या पुण्याच्या मेट्रोमधील एक व्हिडीओ आज दिवसभर सर्वांच्या स्टेटसला झळकत असल्याचं दिसत आहे. पुण्यात नुकत्याच सुरू झालेल्या मेट्रोमधील हा व्हिडीओ आहे.

एक इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती एक वृद्ध आजोबांजवळ जातो. त्यावेळी मेट्रोत बसल्यावर तुम्हाला कसं वाटतंय, असा प्रश्न व्यक्तीने आजोबांना विचारला.

त्यावेळी कोणताही क्षण न दवडता, आजोबांनी पुणेरी भाषेत उत्तर दिलं. आताच बसलोय, परत या, असं आजोबा म्हणाले. त्यांचं हे उत्तर सर्वांना आवडल्याचं पहायला मिळतंय.

पुणेरी भाषा जगात भारी, असं म्हणतात. त्याचा प्रत्त्य आता सर्वांना आल्याचं या व्हिडीओच्या माध्यामातून पहायला मिळतंय.

दरम्यान, आज दिवसभर फक्त या व्हिडीओचीच चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. अनेकांना हा व्हिडीओ आपल्या स्टेट्सला ठेवला आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

नवरा असो किंवा बाॅयफ्रेंड मुली कधीच सांगत नाहीत ‘हे’ पाच सिक्रेट

8 लाखाच्या आत मिळतीये 7 सीटर आरामदायी कार; Kia Carens सह ‘या’ 4 गाड्यांना जोरदार मागणी

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे होतोय ‘या’ कंपन्यांना फायदा; वाचा सविस्तर

लवकरच 2022 Maruti S-Cross भारतीय बाजारात धडकणार; जाणून घ्या फिचर्स

हाडं मजबूत करायची असतील तर आहारात करा ‘या’ 9 गोष्टींचा समावेश; म्हातारपणात त्रास नको