राहुल गांधींना माफी नाही त्यांना तर शिक्षा द्यायला पाहिजे; स्मृती इराणी भडकल्या

नवी दिल्ली | पहिल्यांदा गांधी घराण्यातल्या मुलाने महिलांवर बलात्कार करा, असं म्हटलंय. त्यांनी फक्त माफी मागून चालणार नाही तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

भाजपने मेक इन इंडियाचं रेप इन इंडिया केलंय, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी एका सभेदरम्यान बोलले होते. त्यावरून आज लोकसभेत बराच गदारोळ पहायला मिळाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना शिक्षा दिली जावी, अशी मागणी केली आहे.

देशातल्या महिला त्यांच्यावर जर काही अतिप्रसंग आला तर त्याला सडेतोड उत्तर द्यायला सक्षम आहेत. पण राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य निंदनीय आहे. सभ्य समाजात राहुल गांधींचं हे विधान कुणालाही मान्य असणार नाही, असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी कधीही माफी मागणार नाही. महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. माझ्या मोबाईलमध्ये एक व्हीडिओ क्लीप आहे, ज्यात पंतप्रधान मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणत आहेत, असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-