“…त्यामुळे भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही”, अमित शहांनी सांगितलं कारण

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची सध्या देशाच्या राजकारणात एकच चर्चा आहे. भाजप, काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि इतर अनेक पक्ष निवडणुकांसाठी एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत.

अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील चौथ्या टप्यातील निवडणुकीपूर्वी मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे अमित शहांचं हे वक्तव्य आता देशभर चर्चेचा विषय बनतंय.

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप मुस्लिमांना तिकीट देत नसल्याबद्दल उपस्थित होत असलेल्या प्रश्नाला अमित शहा यांनी उत्तर दिलं आहे. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणासंर्दभात एका मुलाखत त्यांनी वक्तव्य केलंय.

अमित शहा यांनी मुलाखतीत बोलले की, आम्ही व्होट बँकेनुसार लोकांना पाहत नाही. ज्यांच्या अधिकार त्यासोबत सरकार, असं सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय.

त्यानंतर युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील यावर उत्तर दिलं. मुस्लिम समुदायासह तेच नातं आहे जे एका सरकारचं असायला पाहिजे. परंतु निवडणुकीत कोण मतदान करतं हे देखील बघण्याची गरज आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

अमित शहा यांनी मुलाखतीत बोलले की, योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये लूट, अपहरण, बलाक्तार आणि जमीन बळकवण्याचे प्रकार कमी झाले आहेत.

समाजवादी पक्षाचा सहारा घेत अखिलेश यादव यांच्या काळात एफआयआर नोंदवणे ही मोठी गोष्ट होती असंही अमित शहा यांनी यावेळी मुलाखतीत म्हटलं.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर दरोडे 72 टक्क्यांनी कमी झाले, तर लूटमार 62 टक्क्यांनी कमी झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, भाजप 300 हून अधिक जागा जिंकून उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सरकार स्थापन करेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बिल गेट्स यांनी दिला जगाला धोक्याचा इशारा, म्हणाले “कोरोनानंतर आता…”

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोदी सरकारचा दणका

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना न्यायालयाचा झटका, सुनावली ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा

रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

…म्हणून साई पल्लवीने धुडकावली 2 कोटी रुपयांच्या जाहीरातीची ऑफर!