बिल गेट्स यांनी दिला जगाला धोक्याचा इशारा, म्हणाले “कोरोनानंतर आता…”

मुंबई | दोन वर्षापूर्वी जगाला कोरोना नावाच्या महामारीला सामोरं जावं लागलं होतं. अचानक उद्भवलेल्या या महामारीमुळे जगाला भयभित करून सोडलं होतं.

मोठ्या संख्येने रूग्ण वाढू लागल्याने अनेक देशात लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली. आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला. आता दोन वर्षानंतर कोरोना कमी होत चालला आहे.

अशातच आता मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी जगावर धोक्याचा इशारा दिला आहे. जगावर लवकरच आणखी एका महामारीचं संकट येईल असलल्याचं बिल गेट्स यांनी सांगितलं आहे.

हवामानातील बदल आणि जागितक आरोग्याच्या मुद्द्यावर बिल गेट्स नेहमी चर्चा करत असतात. त्यांच्या Gates Notes ब्लॉगमध्ये त्यांनी विस्तृतपणे आपली मतं व्यक्त केली आहे.

अशातच सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत बिल गेट्स यांनी मोठं वक्तव्य केलंय. लवकरच आणखी एक महामारी येणार आहे आणि ही महामारी कोरोनापेक्षा वेगळी असेल, असं भाकित त्यांनी यावेळी केलं आहे.

गंभीर आजारांचा धोका आणि तो देखील खासकरून वृद्ध, जाड आणि मधुमेह असणाऱ्यांसाठी आता संसर्गाच्या माहितीमुळे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं गेट्स यांनी म्हटलं आहे.

येणाऱ्या महामारीसाठी तयार राहणं जास्त खर्चिक असणार नाही. हे ग्लोबल वॉर्मिंगसारखं नाही, असंही ते यावेळी म्हणाले. आपण नीट प्रयत्न केले तर पुढल्यावेळी महामारीच्या एक पाऊल पुढे असू शकतो, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोदी सरकारचा दणका

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना न्यायालयाचा झटका, सुनावली ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा

रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

…म्हणून साई पल्लवीने धुडकावली 2 कोटी रुपयांच्या जाहीरातीची ऑफर! 

‘ज्याच्या घामातून शिवसेना पुढे आली त्या राणेंना…’; ‘या’ शिवसेना नेत्याने राऊतांना सुनावलं