“…म्हणून नेहमी मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही”

जळगाव | कोरोनाकाळात राज्यात चांगलीच राजकीय नाट्य रंगली आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील मुख्य काही पक्षांतर्गत वाद चालल्याच्या चर्चा दबक्या आवाजात चालू होत्या.  अशातच आता पुन्हा एकदा भाजप पक्षातील काही नेते एकमेकांवर नाराज असल्याचं समोर आलं आहे.

मी भाजप पक्षातील मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो. त्यामुळे नेहमी मला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही, असं वक्तव्य भाजप नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

तसेच माझ्यावर आत्तापर्यंत अनेक खोटे आरोप केले गेले. मात्र, माझ्यावर केलेले आरोप सिध्द करू शकले नाहीत. जाणिवपूर्वक मला पदावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला गेला. भ्रष्ट लोकांना पक्षात घेतलं गेलं मात्र ज्यांनी पक्षासाठी आपल्या जिवनातील 40 वर्ष जिवाचं रान केलं. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं. त्यांच्या जीवाची पक्षाला कदर नाही का?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.

पक्षानं ज्यांना तिकिटं दिली त्यांना हरवलं.  पक्षातून माझं तिकीट कापलं गेलं माझ्या मुलीला हरवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. याबाबतचे सर्व पुरावे देखील मी दिले आहेत. तरीही आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत. सर्वांना क्लीन चीट दिली जाते मग मला का क्लीन चीट मिळत नाही?, असाही सवाल खडसे यांनी केला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला होता. दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा खरमरीत शब्दात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता.

एकेकाळी राज्यात भाजप पक्षाला प्रतिकूल परस्थिती असतानाही नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे आणि मी आम्ही सर्वांनी मिळून पक्षासाठी कष्ट करून पक्षाची उभारणी केली आहे, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतप्रकरणी मोठी कारवाई ! बंगळुरूमधून ‘या’ बड्या अभिनेत्रीसह दोघांना अटक

सुशांतप्रकरणी रियाचा भाऊ शौविक सोबतच सॅम्युअल मिरांडाही गजाआड, रिया चक्रवर्तीच्याही अटकेची शक्यता

ऐकावं ते नवलंच! 9 तास झोपा आणि लाखो रुपये कमवा; भारतीय कंपनी देतेय आगळीवेगळी संधी

सुशांत प्रकरणाचं गूढ उकलणार; मानसोपचार तज्ज्ञांनी केला सर्वात मोठा खुलासा!

रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावामधील धक्कादायक चॅटिंग आलं समोर, पाहा काय आहे चॅट

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy