“…म्हणून भारताने रशिया किंवा युक्रेनची बाजू घेतली नाही”

मुंबई | सध्या युक्रेन आणि रशिया (Russia Ukraine war) या दोन देशात घनघोर युद्ध सुरू आहे. रशियाने आक्रमक पाऊलं उचलत युक्रेनच्या अनेक भागात आपलं वर्चस्व आता प्रस्तापित केलं आहे.

रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम आता जगभरात होताना दिसत आहे. युक्रेनने जगातील अनेक देशाकडे मदत मागितली होती. मात्र, महासत्ता असलेल्या रशियाविरूद्ध पंगा घेण्यास कोणताही देश पुढे आला नाही.

काही देशांनी समोर येत रशियावर टीका केली होती. संयुक्त राष्ट्र आणि इतर जागतिक मंचावर अनेक देशांनी रशिया विरूद्ध आवाज उठवला होता.

भारत, चीन आणि युएईने या प्रकरणात तटस्थ भूमिका घेतली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

चीन आणि भारतने कोणाची बाजू घेतली नाही, कारण नेहरूंच्या काळापासून भारताचं ते धोरण आहे. संघर्षात आपण कुणाची बाजू घेत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका घेतली आहे. त्यावर टीका करण्याची गरज नाही, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहे. आपल्या मुलांना बाहेर कसं काढता येईल, यावर लक्ष दिलं पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, युक्रेनचे नागरीक भारतीय मुलांवर नाराज आहेत. तुमच्या देशाने ठोस भूमिका घेतली नसल्याचं ते सांगत आहेत, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“संजय राऊतांच्या जीभेला हाड उरलंच नाही, जनाची मनाची…”

“नारायण राणेंनाही अटक झाली होती, तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला का?”

शरद पवारांनी नरेंद्र मोदींना दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले… 

“राज्यपाल हे भापजचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करतात” 

नितेश राणेंच्या नव्या ट्विटने चर्चांना उधाण, म्हणाले…