‘…तर मिनी लॉकडाऊन लावण्यात येईल?’; किशोरी पेडणेकरांचा इशारा

मुंबई | कोरोना आणि ओमिक्राॅनच्या वाढत्या रुग्णसंख्येनं राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. दिवसेंदिवस झापाट्यानं वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. अनेकांना कोरोनाची लागण होत असलेली पहायला मिळत आहे.

मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा तर धडकी भरवणारा आहे. मुंबईतील कोरोना पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी वक्तव्य केलं आहे.

सध्यातरी पूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नसून मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.

संपूर्ण लाॅकडाऊन लागणार नाही. मात्र लोक बेजबाबदारपणे वागले. नियमांचं उल्लंघन केलं तर लाॅकडाऊन लावावा लागू शकतो, असंही पेडणेकर यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री आणि शरद पवार याबाबतचा निर्णय घेतील. मुंबईतील निर्बंधाबाबत आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत निर्णय जाहीर होऊ शकतो असं महापौर पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे मिनी लॉकडाऊन लावणं परवडणार आहे, असं महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सरकारकडून काय निर्णय घेण्यात येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा सौम्य असल्यामुळे तो फक्त एक फ्लू असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, त्याला गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं मुंबईच्या आयुक्तांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  पेट्रोल-डिझेलसाठी आता मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत, वाचा आजचे ताजे दर

  पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ भागात अलर्ट जारी

  तरूणाला oyo वरून रूम बुक करणं पडलं महागात, घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

‘लस नाही, तर रेशनही नाही’; ‘या’ भागात नवे आदेश

‘कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं काम करु नक’; ‘त्या’ ट्विटवरुन चंद्रकांत पाटलांचा इशारा