‘कपिल शर्मा शो’मधील ‘या’ कलाकाराचा आत्महत्येचा प्रयत्न, हे धक्कादायक कारण आलं समोर

मुंबई | साधारण दोन वर्षांपासून थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. कोरोना महामारीचा फटका सामान्य जनतेसह अगदी कलाकारांनाही बसला.

काही कलाकारांची आर्थिक स्थिती इतकी हालाकीची झाली की त्यांनी सोशल मीडियाच्या मार्फत मदत मागितली. तर काही कलाकारांनी आर्थिक परिस्थितीमुळे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

कॉमेडियन कपिल शर्माच्या एका सहकलाकाराने गरिबीला कंटाळून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार तीर्थानंद राव असं या कलाकाराचं नाव आहे.

नाना पाटेकर सारखा दिसणारा कलाकार अशीही तीर्थानंद यांची ओळख आहे. तीर्थानंद यांनी कपिल शर्मा सोबत ‘कॉमेडी सर्कस के अजूबे’ या शोमध्ये एकत्र काम केलं होतं.

तीर्थानंद आणि त्यांचं कुटुंब एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतं पण गेल्या 15 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्याशी बोलत नाहीत. तर सध्या मी कर्जबाजारी असल्याचं तीर्थानंद यांनी सांगितलं आहे.

26 डिसेंबर रोजी तीर्थानंद यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तीर्थानंद यांना तातडीने रूग्णालयात नेलं व त्यांचा जीव वाचला.

काम संपवून घरी आल्यावर घरातला एकटेपणा खायला उठतो आणि शिवाय आर्थिक चणचण यामुळे तीर्थानंद यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

दरम्यान, तीर्थानंद 15 वर्षांपासून अभिनय करतात. ते बरे झाल्यावर कपिल शर्माकडे कामासाठी विचारणार असल्याचंही तीर्थानंद यांनी सांगितलं आहे.

मी पाच भाषांमध्ये काम केलं आहे. तीर्थानंद यांनी भरपूर पैसा कमावला पण ते आता आर्थिक अजचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उटललं.

महत्वाच्या बातम्या-

झुलन गोस्वामींच्या बायोपिकचा टीझर पाहताच नेटकऱ्यांनी अनुष्काला केलं ट्रोल, म्हणाले…

पेट्रोल-डिझेलसाठी आता मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत, वाचा आजचे ताजे दर

कोरोनाला रोखायचं असेल तर घरातील फक्त ‘या’ पदार्थांचा करा वापर

पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ भागात अलर्ट जारी

…तर राज्यात निर्बंध वाढवा, शरद पवारांनी दिल्या सूचना