….म्हणून आता 12 वी चे विद्यार्थी नापास होणार नाहीत!

मुंबई |  10 वीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरचा नापास हा शेरा पुसला जाणार आहे. त्याऐवजी पुन:परिक्षेसाठी पात्र किंवा कौशल्यविकासासाठी पात्र असा शेरा देण्यात येणार आहे.

10 वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरचा नापास हा शेरा यापूर्वीच काढून टाकण्यात आला आहे. कौशल्य विकास विभागाने 10 वी आणि 12 वी तल्या कौशल्य विकासासाठी पात्र असा शेरा मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कौशल्य सेतू’ योजना आखली आहे. त्यामुळे आता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर देखील सुधारित शेरे पाहायला मिळतील.

जे विद्यार्थी दहावी बारावीच्या पुनर्परीक्षेत यशस्वी होणार नाहीत त्यांना नापास न ठरवता कौशल्यविकासासाठी थेट प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे आयुष्यभर 12 वी नापास असा शिक्का बसण्यापासून आता राज्यातील विद्यार्थ्यांची कायमची सुटका झाली आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाने विद्यार्थी वर्गात कशा प्रकारचं वातावरण आहे, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“1947 मध्येच सगळ्या मुस्लिमांना पाकिस्तानात हाकलून द्यायला पाहिजे होतं”

-वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाण यांच्यावर एमआयएमची मोठी कारवाई

-भारतात 1 कोटी लोक माझं स्वागत करणार- डोनाल्ड ट्रम्प

-ओवैंसींच्या सभेत गोंधळ; तरूणीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा!

-“इतकी लपवा-छपवी लहान मुलंही करत नाहीत, जितकी मोदी सरकार करत आहे”