“1947 मध्येच सगळ्या मुस्लिमांना पाकिस्तानात हाकलून द्यायला पाहिजे होतं”

नवी दिल्ली |  1947 मध्येच देशातील सगळ्या मुस्लिमांना पाकिस्तानात हाकलून द्यायला पाहिजे होतं, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी केलं आहे. पुर्णिया येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

देशात सीएए कायद्याच्या आडून भारताच्या विरोधी अजेंडा राबवण्यात येत आहे. नागरिकता संशोधन कायद्याच्या संदर्भात पाकिस्तान ज्या भाषेचा वापर करत आहे तीच भाषा काँग्रेस पक्ष, जेडीयू आणि कम्युनिस्ट पक्षाचे लोक बोलत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

जेएनयू विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार ‘जन-गन-मन’ या कार्यक्रमानिमित्त बिहार दौऱ्यावर आहे. कन्हैया सध्या ज्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे त्याच जिल्हाच्या दौऱ्यावर सध्या गिरीराज सिंह आहेत.

दिल्लीतील शाहिनबागेत शरजील इमाम म्हणतो, आम्ही इस्लामिक स्टेट बनवू आणि भारताची विभागणी देखील करू, तेव्हा लक्षात येतं की शाहिनबागेत होणारं आंदोलन हे लोकशाही पद्धतीने नाही तर खिलाफत आंदोलन होत आहे, असंही गिरीराज सिंह म्हणाले.

दरम्यान, देशातील नागरिकांनी सध्या देशासाठी समर्पण करण्याची वेळ आलीये, असं म्हणत 1947 मध्येच सगळ्या मुस्लिमांना पाकिस्तानात हाकलून द्यायला पाहिजे होतं, असं गिरीराज सिंह म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाण यांच्यावर एमआयएमची मोठी कारवाई

-भारतात 1 कोटी लोक माझं स्वागत करणार- डोनाल्ड ट्रम्प

-ओवैंसींच्या सभेत गोंधळ; तरूणीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा!

-“इतकी लपवा-छपवी लहान मुलंही करत नाहीत, जितकी मोदी सरकार करत आहे”

-तलवारीचं उत्तर तलवारीने देऊ; मनसेचा वारीस पठाण यांना इशारा