…म्हणून नवरदेवाने भरमंडपात नवरीच्या पायावर डोकं ठेवलं; पाहा व्हिडीओ

मुंबई | लग्न म्हटलं की मजामस्ती, धिंगाणा आलाच. तसेच लग्न म्हटलं की नवरीची पाठवणूक आणि भावूक करणारे क्षण देखील आलेच. अनेक लग्नांमध्ये तुम्ही नवरीला रडताना पाहिलं असेल. परंतु तुम्ही केव्हा लग्नात नवरदेवाला रडताना पाहिलं आहे का?

सध्या सोशल मीडियावर एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क नवरदेव नवरीला पाहून आपल्याच लग्नात रडताना दिसत आहे. हा नवरदेव फक्त रडतच नाही तर नवरीच्या पायावर डोकं देखील टेकवतो.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नवरदेव आणि नवरी एकमेकांसमोर बसले आहेत. दोघांच्या मध्ये अंतरपाट धरलेला आहे. लग्नहॉल वऱ्हाडी मंडळींनी भरला आहे.

नवरदेव आणि नवरीमधील अंतरपाट जेव्हा हटवला जातो तेव्हा नवरदेव प्रथमच नवरीला ब्राईडल लूकमध्ये पाहतो. नवरीचा हा लूक पाहून नवरदेव हैराण होतो आणि एकटक तिच्याकडे पाहतच राहतो. त्याच्या आनंदला पारावार राहत नाही.

याचवेळी नवरीचं हे रूप पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. तो कसंबसं आपलं रडू आवरतो आणि डोळे पुसत रडायला येत असल्याचं दाखवत आपल्या भावना व्यक्त करतो. याचवेळी तो नवरीच्या पायावर देखील डोकं टेकवतो.

हे पाहून नवरीच्या देखील चेहऱ्यावर हास्य उमटतं. तसेच यावेळी उपस्थित सर्वजण नवरदेवाकडे कुतूहलाने पाहतात. आपल्या भावना व्यक्त करण्याचा नवरदेवाचा हा अंदाज अनेकांना आवडला आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आलं नाही. मात्र, नवरदेवाचा हा व्हिडीओ लोकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

https://www.instagram.com/reel/CLOLLuFgPgL/

महत्वाच्या बातम्या –

हॉट सीन करताना मी प्रचंड घाबरले मग बॉबीने…; ‘आश्रम’ वेबसिरीजमधील अभिनेत्रचा खुलासा!

सलमान खानला अडवणाऱ्या ‘त्या’ सीआयएसएफच्या जवानाचं होतंय सर्वत्र कौतुक, पाहा व्हिडीओ!

बिअर पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?, जाणून घ्या!

…अन् पठ्ठ्यानं लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोडच टॅटू म्हणून काढला, पाहा व्हिडीओ!

मुलगा हिरो झाला म्हणून मी किसिंग सीन करायचे नाही का? – जॅकी श्रॉफ