विमानात प्रवासादरम्यान तरूणाने असं काही केलं की, तातडीने करावं लागलं लँडिंग

नवी दिल्ली |  आजकाल अनेक अगळ्या-वेगळ्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. काही अशा घटना घडतात की ज्यांच्यावर विश्वास ठेवणंही कधी-कधी जड होऊन जातं. अशातच अशीच एक घटना घडली असल्याचं समजतं आहे.

एअर एशियाच्या बंगळुरवरून दिल्लीला जात असलेल्या विमानात एक ध.क्कादायक घटना घडली आहे. विमानातील क्रू मेंमबरसोबत झालेल्या भांडणानंतर प्रवाशानं आपल्या अंगावरील कपडे काढायला सुरूवात केली. त्यानंतर या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.

त्या विमानातील एका प्रवाशाने एएनआयसोबत बोलताना सांगितलं की, सर्व प्रथम या प्रवाशी तरूणाने विमानातील क्रू मेंमबरसोबत वाद घातला. त्यानंतर त्याला विमानातील स्टाफने शांत करण्याचा प्रयत्न केला. पंरतू त्याने विमानतच आपल्या अंगावरचे कपडे काढायला सुरूवात केली.

तसेच कपडे काढणाऱ्या त्या व्यक्तीचं वर्तन अतिशय चुकीचं असल्याचं एअर एशियाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. या घटनेबदद्ल एअर एशियाच्या प्रवक्त्यांना विचारले असता, त्यावेळी त्यांनी माहीती दिली.

क्रू मेंबर्स आणि विमानातील इतर प्रवाशांच्या मदतीने हे प्रकरण शांत करण्यात आलं. त्यानंतर या घडलेल्या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वैमानिकानं या घटनेची माहिती दिल्ली एअर ट्राफिकला दिली. त्याचबरोबर वैमानिकानं दिल्ली एअर ट्राफिककडे लवकरात लवकार लँडिंग करण्याचीही परवानगी मागितली.

लँडिंग होताच या प्रवाशाला  सीआयएसएफच्या मदतीनं पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसंबंधीच्या कायद्यानूसार या युवकावर योग्य ती कारवाई होणार असल्याची माहीती देण्यात आली आहे.

तसेच प्रवाशाने केलेल्या वर्तनामुळे त्याला एअरलाईन्स नो फ्लाय लिस्टमध्येही टाकू शकत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन,…

आता आधार कार्डवरही लावता येणार आपल्या आवडीचा फोटो, वाचा…

ज्येष्ठ नागरिकाचे ठुमके पाहून विरेंद्र सेहवाग म्हणतो…,…

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम! पहिल्याच सामन्यात भिडणार भारतीय…

डान्स करता-करता महिलेने चक्क स्टेजवर चेंज केला ड्रेस, पाहा