‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

मुंबई| मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिचे वडील माधव लिमये यांचं गुरुवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे. भाग्यश्रीनेच सोशल मीडियावर तिचा आणि बाबांचा फोटो पोस्ट करत, भाग्यश्रीने सोशल मीडियावर तिचा आणि बाबांचा फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

भाग्यश्रीचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे म्हटले जात आहे. सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.  भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बाबांसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला ‘रेस्ट इन पीस बाबा’ असं कॅप्शन दिलं. भाग्यश्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भाग्यश्रीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच मराठी चित्रपटसृष्टीतील सुव्रत जोशी, शशांक केतकर, सुबोध भावे, स्पृहा जोशी, श्रृती मराठे यांच्यासह अनेक कलाकारांनी तिला धीर देत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भाग्यश्री ही मनोरंजन विश्वामध्ये येण्याआधी आयटी कंपनीमध्ये कामाला होती. भाग्यश्रीने 2014 मध्ये ‘मटा श्रावण क्विन’ चा किताब मिळवला होता. त्यानंतर तिने मनोरंज विश्वात प्रवेश केला.

भाग्यश्रीने 2017मध्ये ‘घाडगे & सून’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेली अमृता प्रभुणेची भूमिका चांगलीच गाजली. घाडगे आणि सून या मालिकेतून भाग्यश्रीने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. भाग्यश्रीने अनके जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

ज्येष्ठ नागरिकाचे ठुमके पाहून विरेंद्र सेहवाग म्हणतो…,…

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम! पहिल्याच सामन्यात भिडणार भारतीय…

डान्स करता-करता महिलेने चक्क स्टेजवर चेंज केला ड्रेस, पाहा…

‘या’ गावात कपडे न घालण्याची अनोखी पंरपरा,…

IPL 2021: पहिल्या सामन्याआधी विराट कोहलीचा चाहत्यांना खास…