…म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उरकला महिला कॉन्स्टेबलचा हळदीचा कार्यक्रम, कारण ऐकूण तुम्हीही व्हाल चकित

राजस्थान | गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे. यात सरकारने 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या सगळ्यामध्ये जे फ्रन्ट लाईनवर काम करत आहेत. त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्यावर जास्त ताण आल्याचं दिसतं आहे.

यासगळ्यात या कर्मचाऱ्यांचे डेली रूटीन चेंज झालं आहे. यांना सुट्टीही मिळत नाही. याच दरम्यान राजस्थानच्या डुंगरपूरमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

एका पोलीस कॉन्स्टेबलला तिच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी सुट्टी हवी होती. परंतू शहरात लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्या महिला कॉन्स्टेबलला सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्येच तिच्या हळदीचा कार्यक्रम उरकला. त्या महिला कॉन्स्टेबलचे नाव आशा रोत असून, तिचं लग्न येत्या 30 एप्रिल रोजी असल्याचं समजतं आहे.

त्या पोलीस स्टेशने इंचार्ज दिलीप दान यांनी सांगितले की राजस्थानमध्ये कोरोना वाढत असून आशाची ड्युटीही लागली आहे. यादरम्यान आम्हाला समजलं की, आशाची हळद आहे आणि ती घरी जाऊ शकत नाहीये. त्यामुळे आम्ही मुहूर्ताच्या हिशेबाने पोलीस स्टेशनमध्येच हळदीची तयारी केली.आम्ही सर्वांनी कॉन्स्टेबल आशाला सरप्राइज दिलं.

या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्या महिला कॉन्स्टेबलला पोलीस स्टेशनमधील काही महिला कर्मचाऱ्यांनी हळद लावली असल्याचं व्हायरल फोटोमध्ये दिसतं आहे.

दरम्यान, , आशाचं गाव हिराता शहरापासून २० किमी अंतरावर आहे. तसेच आशाचं लग्न मागील वर्षी होणार होतं. परंतू कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही. त्यामुळे आता आशाचं लग्न  ३० एप्रिलला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘ही’…

क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या बायकोचा ‘हा’…

जाणून घ्या! वॅक्सिनचे काही साईडइफेक्ट आहेत का?

IPL 2021: अर्धशतक पूर्ण झाल्यावर विराटनं ‘या’…

डाॅक्टरला ऑक्सिजनसाठी रडताना पाहून ‘या’…