सोशल मीडियावर निवृत्ती महाराज इंदुरीकरांना मोठा पाठिंबा!

पुणे | ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या प्रवचन आणि कीर्तनाच्या शैलीमुळे राज्यभर चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतंच मुलगा आणि मुलीच्या जन्मासंदर्भात दिलेलं वक्तव्य वादात सापडलं असून त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. या सगळ्यात देखील इंदुरीकर महाराजांना चांगलाच पाठिंबा मिळताना दिसतोय.

सोशल मीडियावर अनेकजण इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. त्यांच्या पाठिंब्यासाठी काही ग्रुपदेखील सुरु करण्यात आले असून यामध्ये सहभागी होणारांची संख्या लक्षणीय आहे.

सोशल मीडियावर पोस्ट किंवा ट्विटच्या माध्यमातून देखील इंदुरीकर महाराजांना मोठा पाठिंबा दिला जातोय. #ISupportIndurikarMaharaj सारखे हॅशटॅग वापरुन या पोस्ट केल्या जात आहेत. यामध्ये त्यांच्यावर टीका करणाऱ्या समाजसेवकांचा जोरदार समाचार घेतला जात आहे.

इंदुरीकर महाराजांची कीर्तन तसेच प्रवचन करताना प्रबोधन करण्याची एक विनोदी शैली आहे. त्यांच्या या शैलीमुळे राज्यभरात त्यांचे लाखो चाहते तयार झाले आहेत, आज महाराजांवर टीका होत असताना यातील अनेक चाहत्यांनी त्यांच्या पाठराखण केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नाशिक जिल्ह्याच्या शाळांमध्ये वीजेची तक्रार; शिक्षणमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश

-…म्हणून आता इंदुरीकर महाराज ‘बाऊन्सर’ घेवून फिरणार!

-“गद्दारांना माझ्या पक्षात जागा नाही, दोन दिवसात गद्दारांची हाकालपट्टी होईल”

-राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… महापोर्टलद्वारे नाही तर ऑफलाईन होणार!

-इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेलवाल्यांना दिला दणका; चॅनेलवाल्यांनी उडवले सर्व व्हिडीओ