सोलापूरमध्ये शिवशाही बसला भीषण अपघात; 11 प्रवासी जखमी

सोलापूर : सोलापुरात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून 11 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात मल्लिकार्जुन आबुसे असं मृत पावलेल्या प्रवाशाचं नाव आहे. शिवशाही बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात जखमींना प्रत्येकी 1 हजार, तर मयत मल्लिकार्जुन आंबुसे यांच्या कुटुंबीयांना 10 हजार रुपयांची मदत दिली आहे.

शेटफळ फाट्याजवळ हा अपघात झाला. शिवशाही बस पुण्याहून सोलापूरला येत असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते.

दरम्यान, अपघात इतका भीषण होता की, बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.