“TV वर येत एकजण नाचतोय, बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना”

मुंबई | काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक (Election result) घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने जोर लावला होता. तर महाविकास आघाडीने देखील अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. त्यानंतर आता कोल्हापूरच्या जनतेने जयश्री जाधव यांना मताधिक्य दिलं आहे.

अशातच आता मविआ आणि भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू झाली होती. कोल्हापूर उत्तरचा निकाल लागला. काँग्रेस पुन्हा मतदारसंघ जिंकला, असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.

भाजपला या निवडणुकीत मते जवळजवळ दुपटीने वाढवली असल्याचं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. पण शिवसेना मतदारसंघ आणि मते दोन्ही गमावले, अशा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

तरीही टीव्हीवर येत एकजण नाचतोय, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना, असंही ट्विट केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मी पोहोचलो रे हिमालयात, नको परत या….’; राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

उत्तर कोल्हापूरात इतिहास घडणार, गेल्या 50 वर्षांत जे झालं नाही ते होणार!

भाजपला सर्वात मोठा झटका; जयश्री जाधवांचा दणदणीत विजय

भाजपला धक्का?, उत्तर कोल्हापुरात काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर

हनुमान चालिसा पठणापूर्वी राज ठाकरेंना जोर का झटका!