“हा वेडेपणा समजावा की देशद्रोह, हेच समजत नाही”

नवी दिल्ली | आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. सर्वांच्या त्यागानं या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. अशातच आता बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

आपल्या अभिनयानं कमी आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कंगणा राणावत सध्या जास्त प्रसिद्धी झोतात आहे. परिणामी तिने आता पुन्हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर जावई शोध लावला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना कंगणानं चक्क देशाच्या स्वातंत्र्याला भीकेत मिळाल्याचं म्हटलं आहे. 1947 साली देशाला भीक मिळाली होती खर स्वातंत्र्य तर 2014 साली मिळाल्याचं वादग्रस्त वक्तव्य कंगणानं केलं आहे.

कंगणाच्या या वक्तव्यावर देशभरातून जोरदार टीका करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अपमान करणाऱ्या कंगणाला कोणत्या शब्दात बोलावं हेच कळत नाही, अशी टीका भाजप खासदार वरूण गांधी यांनी केली आहे.

कधी महात्मा गांधीच्या त्याग आणि तपश्चर्येचा अपमान, कधी महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्यांचा सन्मान करणारी कंगणा वेडेपणा करत आहे, अशी टीका वरूण गांधी यांनी केली आहे.

आता तर कंगणानं चक्क स्वातंत्र्य संग्रामातील सर्व महान नायकांचा अपमान केल्याचं गांधी म्हणाले आहेत. कंगणा राणावत यांच्या वक्तव्यावर वरूण गांधी यांनी जोरदार टीका केली आहे.

शहीद मंगल पांडे पासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा तिरस्कार कंगणानं केला आहे, अशी टीका वरूण गांधी यांनी केली आहे.

कंगणाच्या या विचारांना मी वेडेपणा समजू का देशद्रोह तेच समजत नसल्याची टीका वरूण गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. परिणामी सध्या सर्व स्तरातून कंगणावर टीका करण्यात येत आहे.

नुकतच नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नागरी पुरस्कार सोहळ्याचं वितरण करण्यात आलं आहे. या सोहळ्यात कंगणाला पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं होतं. आता कंगणानं हे असंल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं सर्व स्तरातून कंगणावर जहरी टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, कंगणा राणावतनं कार्यक्रमात बोलताना देशभक्तांचा आणि स्वातंत्र्य चळवळीतील सर्वांचा अपमान केल्या प्रकरणी कंगणाचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा आणि कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

  “तुमच्याकडं चाणक्य तर आमच्याकडं लाल मातीतला बाप आहे”

  मोठी बातमी! गुजरातमधून 350 कोटींचं ड्रग्ज जप्त

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली”