‘येत्या 48 तासात नवाब मलिकांनी…’; अमृता फडणवीसांचा मलिकांना अल्टीमेटम

मुंबई | मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईनंंतर आता देशाचं वातावरण तापलेलं पहायला मिळत आहे. या प्रकरणात सर्वप्रथम नवाब मलिक यांनी उडी घेत एनसीबीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग लागल्याचं दिसून येत आहे.

नवाब मलिकांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक आरोप केले आणि अखेर आता हा मोर्चा भाजपकडे वळल्याचं दिसून आलं. नवाब मलिकांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचा ड्रग्ज पेडलरशी संबंध आहे का?, असा सवाल उपस्थित करत गंभीर आरोप केले होते.

मलिकांच्या या आरोपानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावले होते. त्यावेळी त्यांनी मलिकांना इशारा देखील दिला होता.

फडणवीसांनी नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी अमली पदार्थ सापडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक-खान यांनी फडणवीसांना नोटीस पाठवली.

अशातच आता अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना अल्टीमेटम दिला आहे. आता नवाब मलिकांनी अमृता फडणवीस आणि ड्रग्ज पेडलर याचा फोटो केलेल्या प्रकरणावरून नवाब मलिकांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

ट्विट करत अमृता फडणवीसांनी मलिकांना 48 तासाचा अल्टिमेटम दिला आहे. या प्रकरणात नवाब मलिकांनी जाहीर माफी मागावी आणि ट्विट केलेला फोटो डिलीट करावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार रहा, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

नवाब मलिकांनी ट्विट करत अक्षेपार्य उल्लेख केला आहे. त्यावर मी आता आयपीसीच्या विविध कलमाखाली मी तक्रार करून अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार आहे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

नवाब मलिकांनी एकतर बिनशर्त माफी मागावी आणि ते ट्विट येत्या 48 तासात डिटील करावं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता मलिक ट्विट डिलीट करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या 2 दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्या कलगीतुरा रंगलेला दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

त्यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी अमली पदार्थ सापडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता ही कायदेशीर लढाई सुरू झाल्याचं दिसतंय.

पाहा ट्विट-

महत्त्वाच्या बातम्या –

“सरकारमध्ये कोणाशी बोलायचं हे राज ठाकरेंना चांगलंच माहितीये”

“देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”

  फडणवीस म्हणाले ‘डुकराच्या नादी लागायचं नाही’, आता नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात”