शेतकरी आंदोलनावर सोनाक्षी सिन्हानं घेतली परदेशी सेलिब्रेटींची बाजू; म्हणाली….

शेतकरी आंदोलनावरुन सध्या सगळीकडे वातावरण पेटलं आहे. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील होऊ लागली आहे. गायिका रिहानानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट केल्यानंतर आता सगळ्या जगाचे लक्ष शेतकरी आंदोलनावर लागून आहे. आता याविषयी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं देखीलपरदेशी सेलिब्रेटींची बाजू घेतलेली आहे.

सोनाक्षीनं सोशल मीडियावर स्टोरी टाकत एक पोस्ट शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये तीनं लिहिलं की ‘रिहाना, ग्रेटा आणि अन्य बाहेरील व्यक्ती जे आज भारततील शेतकरी आंदोलनाविषयी बोलत आहेत त्यांना काही बोलण्याआधी तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज आहे. मान्य आहे की, त्यांना आपल्या देशातील नव्या तीन कृषी कायद्यांविषयी किंवा त्यातीत तरतूदींविषयी काहीही माहित नाही. पण केवळ हाच चिंतेचा विषय नाही. पण त्यांनी मानवी अधिकारांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवला आहे. फ्री इंटरनेट बंद करण्याबाबत आवाज उठवला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत, सरकारचा प्रपोगंडा, तिरस्कारयुक्त भाषण आणि सत्तेचा दुरुपयोगयाबाबत त्यांनी आवाज उठवला आहे.’

‘जेव्हा पत्रकार आणि मीडियाशी संबंधीत लोकांना जेव्हा तुम्ही हा विचार करण्यास भाग पाडता की, बाहेरचे लोक आपल्या देशातील कार्यप्रणालीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवायला हवं ही एक कोणतंही युद्ध नाही तर ही सुद्धा आपल्यासारखीच माणसं जी दुसऱ्या माणसांसाठी आवाज उठवत आहेत’, असं सोनाक्षीनं म्हटलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटी शेतकरी आंदोलनावर व्यक्त होत असल्याचं पाहिल्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी सोशल मीडियावर त्यांची मत मांडली होती. काही कलाकारांनी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना समर्थन केलं तर काहींनी भारताविरुद्ध चुकीचा प्रचार करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत सरकारला समर्थन दिलं.

दरम्यान, भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या रिहानावर कंगनानं खोचक टिका केली होती. रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली आणि लिहिले की, “आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे.” रिहानाला पलटवार करत कंगनाने ट्वीट केले की, “या प्रकरणावर कोणीही बोलत नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत, ज्यांना भारताची विभागणी करायची आहे. जेणेकरुन चीन आपल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवेल. शांत बसून राहा. आमचा देश विकायला आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही.”

महत्वाच्या बातम्या –

‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ यांचं निधन

जाणून घ्या दररोज अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी फायदे‘या’ अभिनेत्रीकडे चाहत्यानं केली न्यूड फोटोची मागणी, अभिनेत्रीनं दिला हटके रिप्लाय

कंगना राणौतला ट्विटरचा झटका, केली ‘ही’ कारवाई

हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का- कंगना राणौत