‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ यांचं निधन

‘झपाटलेला’ चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे काल दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा’… ‘झपाटलेला’ चित्रपटामध्ये तात्या विंचूला असा विचित्र मृत्यूंजय मंत्र देणारे बाबा चमत्कार राघवेंद्र कडकोळ यांनी जगाचा निरोप घेतला आहे. या चित्रपटातील मांत्रिकाची त्यांनी साकारलेली भूमिकेला रसिकांनी डोक्यावर घेतली होती.

अभिनेता राघवेंद्र कडकोळ यांनी ‘कृष्णधवल’ चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी तीन दशकं मराठी नाटक-चित्रपट, मालिकांतून दमदार अभिनय केला. ‘झपाटलेला’ चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका सर्वात जास्त गाजली.

राघवेंद्र कडकोळ यांना बालगंधर्व परिवारातर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे नटवर्य केशवराव दाते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. राघवेंद्र कडकोळ यांनी अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते या सारख्या अनेक नाटकांमधून काम केले. ब्लॅक अँड व्हाईट, कुठे शोधू मी तिला, गौरी, सखी या मराठी चित्रपटात काम केले. तर छोडो कल की बाते या हिंदी चित्रपटात काम केले.

अभिनेते राघवेंद्र कडकोळ पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कडकोळ हे मराठी अभिनेते आणि लेखक होते. त्यांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या दररोज अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी फायदे

    ‘या’ अभिनेत्रीकडे चाहत्यानं केली न्यूड फोटोची मागणी, अभिनेत्रीनं दिला हटके रिप्लाय

      कंगना राणौतला ट्विटरचा झटका, केली ‘ही’ कारवाई

        हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का- कंगना राणौत

          लग्नानंतर ‘या’ कारणामुळे नताशा झाली ट्रोल