“देशातील विद्यार्थी असुरक्षित आणि अन्य देशांतील अल्पसंख्याकांना संरक्षण द्यायला निघालात”

मुंबई | जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. देशातील विविध शिक्षण संस्थामधील विद्यार्थी याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध केला असून मराठी कलाकारही या विरोधात पुढे आले आहेत.

देशातील विद्यार्थी आपल्याच देशात असुरक्षित झाला आहे आणि अन्य देशांतील अल्पसंख्याकांना आपण संरक्षण द्यायला निघालो आहोत, असा सणसणीत टोला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सरकारला  लगावला आहे. तिने यासंदर्भात ट्विट केलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशात लागू करुन भाजप सरकार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधील अल्पसंख्याकांना देशाचे नागरिकत्व देणार आहे. सरकारच्या याच भूमिकेवर बोट ठेवत सोनालीने जोरदार चपराक लगावली आहे.

दरम्यान, जेएनयूत झालेल्या प्रकारामुळे देशभरात वातावरण तापलं आहे. देशभर आंदोलनाचं सत्रं सुरु झालं आहे. सिनेसृष्टीतील दीपिका पादुकोण, अनुराग कश्यप, सोनम कपूर, स्वरा भास्कर यासह सोनाली कुलकर्णीने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-