मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंची अधिकृतपणे राजकारणात एन्ट्री???

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मनसेच्या 23 तारखेच्या अधिवेशनातून अधिकृतपणे राजकारणात एन्ट्री करणार असल्याची शक्यता आहे. त्यांचावर पक्षाची मोठी जबाबदारी देण्याचं बोललं जात आहे.

23 जानेवारीला मुंबईमध्ये अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे. या अधिवेशनात पक्षाचा झेंडा आणि हिंदूत्वाचा मुद्दा धरून मनसे मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एक नवा ठाकरे म्हणजे अमित ठाकरे राजकारणाची माती अंगाला लावणार असल्याचं बोललं जात आहे

तरुण मनसे सैनिकांची ईच्छा आहे की अमित ठाकरेंवर पक्षाची मोठी जबाबदारी दिली पाहिजे. यापूर्वीही अनेकदा मनसे सैनिकांनी राज ठाकरेंकडे ही ईच्छा व्यक्त केली आहे. त्यावर आता अमितवर कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतील, असं मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

दरम्यान, राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. हिंदूत्त्ववादी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हाताशी घेऊन सत्ता स्थापन करू शकते. तर मग आम्हीही आमचा निर्णय घेऊ शकतो, असं सूचक वकव्य मनसे नेेते बाळा नांदगावकर यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या-