शरद पवारांवर माझा पूर्ण विश्वास- सोनिया गांधी

मुंबई |  महाराष्ट्रात आज राजकीय भूकंप पाहायला मिळाला. भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या भूमिकेमागे शरद पवार यांचा हात आहे का? याची चर्चा सुरू झाली होती. मात्र शरद पवारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. यापाठीमागे त्यांचा हात नाही, असं काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटल्याचं कळतंय.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत काँग्रेसची बाजू स्पष्ट केली. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आणि शिवसेनेसोबत आहे. भाजपने लोकशाहीविरोधी सरकार स्थापन केलं आहे, असं टीकास्त्र सुरजेवाला यांनी भाजपवर सोडलं.

काँग्रेसचे आमदार हे काही भाजीपाला नाहीये की त्यांना खरेदी करता येईल. महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवार यांनी दुर्योधन आणि शकुनीमामासारखे काम केलं आहे, असं टीकास्त्र सुरजेवालांना डागलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीची सध्या वाय. बी. सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. लवकरच ही बैठक संपून शरद पवार माध्यमांशी बोलणार असल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-