मर्द मावळे हे रणांगणावर असतात, रात्रीस खेळ करून सत्ता मिळवत नाहीत- उद्धव ठाकरे

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सकाळी घडलेल्या घटनांवर भाष्य केलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

मर्द मावळे हे रणांगणावर असतात, रात्रीस खेळ चाले करून सत्ता मिळवत नाहीत, असं म्हणत त्यांनी घणाघाती टीका केली आहे. देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली जो काही खेळ चाललेला

आहे, हा खेळ संपूर्ण देशाला लाजिरवाणा आहे, असंही ठाकरे म्हणाले आहेत.

हा सगळा खेळ खंडोबा बघितल्यानंतर मला असं वाटतं की, आता निवडणुका घोषित न करता ‘मी पुन्हा येईन’ बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही, असं काहीजण बोलत आहेत. त्यामुळे फेविकॉल लावून माणसे बसली तर अधिक योग्य होईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आज अनपेक्षितपणे अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-