उद्धव आणि आदित्य यांचा मला पाठिंबा, म्हणाले कसलीही मदत करायला तयार आहे- सोनू सूद

मुंबई |  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सोनू सूदवरील बोचऱ्या टीकेनंतर त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर सोनूने इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांच्या भेटीचा सारा तपशील जाहीर केला.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खूप सपोर्टिव्ह आहेत. काहीही मदत लागली तर नक्की सांगा… आम्ही लागेल ती मदत करू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सोनूने सांगितलं. त्यांनी आताही मजुरांना घरी पाठवण्यासाठी मदत केली आहे. त्यांचं खूप सहकार्य लाभलं आहे. म्हणून मी त्यांचे आभार मानू इच्छितो, असं सोनू म्हणाला.

संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना सोनू म्हणाला, “संजय राऊत खूप वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहेत. त्यांच्या विचारानुसार त्यांनी माझ्यावर टीका केली. परंतू त्यानंतरही माझं काम मी बंद केलं नाही. किंबहुना आजही मजुर गावाकडे पाठवण्याबाबत माझे प्रयत्न चालू आहे.”

भाजपशी सोनूचा संबंध आहे या संजय राऊत यांच्या आरोपावर बोलताना सोनू म्हणाला, “माझ्या सध्याचं ध्येय आहे ते म्हणजे मजुरांना घरी पाठवण्याचं. मी एक कलाकार माणूस आहे. माझ्या कोणत्याही पक्षाशी काहीही देणंघेणं नाहीये. मला माझ्या आयुष्यात खूप काही करायचंय. यासाठीच तर मी मुंबईत आलोय.”

महत्वाच्या बातम्या-

-“शिवसेना ही बाळासाहेबांचीच… पण भाजप आता वाजपेयी-अडवाणींचा राहिलाय का?”

-राष्ट्रवादीत आता पुष्पगुच्छ, शाल भेटवस्तू बंद… त्याऐवजी ‘या’ गोष्टी द्या- शरद पवार

-राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा… त्यामुळे कधीच संपला नाही अन् संपणार देखील नाही- शरद पवार

-कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

-आम्हाला फक्त विदुषक हवाय; शरद पवारांचा ‘या’ नेत्याला टोला