मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळतील इतके लाख रूपये

नवी दिल्ली | मुलींचं शिक्षण (Education) हा आर्थिक बोजा वाटू नये यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. खास मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना ही त्यापैकीच एक महत्त्वाची योजना आहे.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणतंही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रँचच्या अधिकृत शाखेत तुम्ही अकाऊंट उघडू शकता. मुलीचा जन्म झाल्यानंतर ती दहा वर्षांची व्हायच्या आत कमीत कमी 250 रुपये भरून या योजनेसाठी अकाऊंट उघडलं जाऊ शकतं.

एका आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दीड लाख रुपये खात्यात जमा केले जाऊ शकतात. सध्या या योजनेअंतर्गत दर वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळतं. या योजनेअंतर्गत कुणीही आपल्या दोन मुलींसाठी अकाऊंट उघडू शकतं.

सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडल्यानंतर मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचं लग्न होईपर्यंत हे खातं खुलं राहू शकतं.

तुम्ही या योजनेअंतर्गत दर महिना तीन हजार रुपये गुंतवले तर दर वर्षीच्या एकूण 36,000 रुपयांवर तुम्हाला 14 वर्षांनंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंड इंटरेस्ट रेटच्या हिशोबाने 9,11,574 रुपये मिळतील.

21 वर्षं म्हणजेच मॅच्युरिटीनंतर ही रक्कम जवळपास 15,22,221 रुपये इतकी होईल. तुम्ही जर रोज 416 रुपयांची बचत केली तर तुमच्या मुलीसाठी 65 लाख रुपये जमा होऊ शकतात.

दरम्यान, 21 वर्षं पूर्ण झाल्यानंतर मुलगी स्वत: या अकाउंटमधून पैसे काढू शकते. या योजनेमध्ये 9 वर्ष 4 महिन्यांत रक्कम दुप्पट होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर” 

“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…” 

मोठी बातमी! युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांनी केल्या ‘या’ मागण्या