The Kashmir Files च्या दबदब्यानंतरही बच्चन पांडेनं पहिल्याच दिवशी कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

मुंबई | ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपटावरून देशात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नव्वदच्या दशकात कश्मीरमध्ये घडलेल्या घडामोडींवर चित्रपट आधारित आहे.

द कश्मीर फाईल्सवरून देशात दोन गट पडले असताना अनेक राज्यांनी चित्रपटाला करमुक्त केलं आहे. चित्रपटानं आतापर्यंत 100 कोटींचा गल्ला जमवला आहे.

द काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पावनखिंड, झुंड, गंगुबाई काठीयावाडी हे चित्रपट देखील सिनेमागृहांमध्ये चालू होते.

इतर चित्रपटांच्या तुलनेत कश्मीर फाईल्सनं चांगली कमाई केली आहे. अशातच अभिनेता अक्षय कुमारचा बच्चन पांडे देखील प्रदर्शित झाला आहे.

बच्चन पांडेनं कमी स्क्रिन मिळूनही पहिल्याच दिवशी तब्बल 13.25 कोटींची कमाई केली आहे. परिणामी कोरोना काळातील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

द काश्मीर फाईल्सचा बोलबाला बाॅक्स ऑफिसवर कायम असताना बच्चन पांडेनं जमवलेला गल्ला ही फार मोठी कामगिरी आहे.

बच्चन पांडे चित्रपटात अक्षय कुमार व्हिलनच्या रोलमध्ये आहे. अभिनेत्री कृती सेनाॅन आणि सह अभिनेता अर्शद वारसी यांनी देखील जबरदस्त अभिनय केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली, आता फक्त ISIS…”

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर” 

“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…”