सिंगापुरमधील मादाम तुसाँमध्ये श्रीदेवींचा मेणाचा पुतळा; बोनी कपूरने केला व्हीडिओ शेअर

मुंबई : बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा 13 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच होता. सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात हा मेणाचा पुतळा ठेवण्यात येणार आहे.

श्रीदेवीच्या पुतळ्याचा हा व्हिडीओ बोनी कपूर यांनी ट्वीटरवरुन शेअर केला आहे. मी मादाम तुसाँ संग्रहालयातील तिचा मेणाचा पुतळा पाहण्यासाठी आतुर आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

मेणाच्या श्रीदेवीला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या मेणाच्या पुतळ्याची पहिली झलक दाखवण्यात आली आहे.

4 सप्टेंबर रोजी श्रीदेवींचा पुतळा सर्वांसमोर सादर करणार येणार आहे. श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त मादाम तुसाँ संग्रहालयाने श्रीदेवीच्या मेणाच्या पुतळ्याचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये श्रीदेवीचा पूर्ण लूक दाखवण्यात आला नव्हता. आता श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी या पुतळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

श्रीदेवीच्या पुतळ्याचा हा व्हिडीओ शेअर करत ‘श्रीदेवी फक्त माझ्याच नाही तर कोट्यावधी चाहत्यांच्या मनात आजही जिवंत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-