कसोटी रँकिंगमध्ये विराटची घसरण; स्मिथ पहिल्या स्थानावर!

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या जमैका येथील कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला महागात पडलं आहे. त्यामुळे त्याचा कसोटी क्रमावारीवरही परिणाम झाला आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा विराट कोहली आता दुसऱ्या स्थानावर आला आहे.

विराटने जमैका कसोटीत पहिल्या डावात 76 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे कसोटी क्रमावारीतील त्याचे गुण कमी झाले. तर अ‌ॅशेज मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने धडाकेबाज कामगिरी करत विराट कोहलीकडून अव्वल स्थान हिसकावले आहे.

स्टिव्ह स्मिथने विराटपेक्षा 1 गुण ज्यास्त मिळवला आहे. आयसीसी क्रमवारीत 904 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्मिथ अव्वल स्थानावर आहे. तर 903 गुणांसह विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.

आयसीसीने मंगळवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंचं वर्चस्व असल्याचे दिसून आलं आहे. विराट कोहलीशिवाय पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अव्वल दहांमध्ये स्थान मिळवलं आहे.

दरम्यान, गोलंदाजीत बुमराहने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याचे 835 गुण आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेत बुमराहनं एकूण 13 विकेट घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर त्यानं कसोटी क्रमवारीत तिसरं स्थान पटकावलं.

महत्वाच्या बातम्या-