भाजप – मनसे युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य

मुंबई | राज्यात आणि एकंदरीतच देशात पक्षांतर आणि सत्तांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमध्ये देखील सत्ताबदल झाला. तसेच अनेक आघाड्या तुटल्या आणि नवीन स्थापन झाल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आणि भाजप नेत्यांच्या भेटी देखील अलीकडे वाढल्या आहेत. काल (दि. 29) रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

या भेटीचे तर्क वितर्क अद्याप सुरु असतानाच, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेसुद्धा (Chandrashekhar Bawankule) ठाकरेंच्या भेटीला गेले. त्यामुळे जनतेच्या आणि अन्य राजकारण्यांच्या भुवया उंचाविल्या आहेत.

मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या (Shivsena) हातातून हिसकावून घेण्याच्या तयारीत भाजप आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि मनसे युती होणार का, अशा प्रश्नांना उधाण आले आहे.

ठाकरेंच्या भेटीला गेलेले बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यामुळे ही राजकीय नाहीतर कौटुंबीक भेट होती, सदिच्छा भेट होती.

राज ठाकरे जेव्हापासून राजकारणात आले, तेव्हापासून ते हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत. राज ठाकरेंचा मुळचा स्वभाव हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे आज त्यांना नव्याने भेटत आहोत, असे काही नाही, असे बावनकुळे म्हणाले.

मनसेच्या युतीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, राज ठाकरेंसोबत युतीबाबत निर्णय आमचे वरिष्ठ घेतील. त्यामुळे सध्यातरी या मुद्द्यावर पडदा पडला असला, तरी आगामी काळात युती होणार की नाही ते कळल्यावाचून राहणार नाही.

महत्वाच्या बातम्या – 

“एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आणि सनातन धर्माचे…” बाबा रामदेव यांचे मोठे वक्तव्य

पूर आणि भीषण महागाईमुळे पाकिस्तान आला ताळ्यावर; भारताकडे केल्या ‘या’ मागण्या

शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्या’वरुन राज ठाकरे यांचे ट्विट चर्चेत

शरद पवार आक्रमक, ‘या’ कारणांमुळे नरेंद्र मोदींना सुनावले खडे बोल

गोकुळच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; शौमिका महाडिक म्हणाल्या, “सत्ताधारी लोक…