जय शहा यांच्या तिरंगा नाकारण्यावर प्रकाश राज आक्रमक; ट्विट करत म्हणाले,

नवी दिल्ली | आशिया चषक स्पर्धेचा भारत विरुद्ध पाकिस्तान (India v/s Pakistan) सामना रविवारी (दि. 28) रोजी झाला. यावेळी क्रिकेटप्रेमी डोळ्यात तेल घालून सामना पाहत होते. भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला.

त्यावेळी संपूर्ण देशात उत्साह आणि आनंद साजरा करण्यात आला. यावेळी मैदानावर देखील उपस्थितांनी आनंद साजरा केला. तेथे अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा (Jay Shah) देखील उपस्थित होते.

जय शहा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आहेत. यावेळचा एक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. सामना संपल्यावर उत्साह साजरा करीत असताना, शहा यांच्या ऐका सहकाऱ्याने त्यांना तिरंगा देऊ केला.

पण त्यावेळी त्यांनी तो घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यांच्या या कृत्याने त्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला, असे बोलले जात आहे. यावर आता प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ट्विट करत थेट गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनाच प्रश्न विचारला आहे.

प्रिय सर्वोच्च नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा, जय शहांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी भारताचा तिरंगा हातात धरुन फिरवायला हवा, असे काही नाही. पण, जर कुणी भाजपेत्तर, अहिंदू किंवा माझ्याप्रमाणेच तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या एकाद्या व्यक्तीने असे काही केले असते, तर त्यावर आपण काय प्रतिक्रिया दिली असती? तसेच आपल्या भक्तमंडळाने काय प्रतिक्रिया दिली असती?, असे ट्विट प्रकाश राज यांनी केले आहे.

जय शहा यांच्य़ा कृत्याचा जाब त्यांनी सरळ त्यांच्या व़डिलांनाच विचारला आहे. त्यावर अद्याप भाजप किंवा जय शहा यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

महत्वाच्या बातम्या – 

भाजप – मनसे युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य

“एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आणि सनातन धर्माचे…” बाबा रामदेव यांचे मोठे वक्तव्य

पूर आणि भीषण महागाईमुळे पाकिस्तान आला ताळ्यावर; भारताकडे केल्या ‘या’ मागण्या

शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्या’वरुन राज ठाकरे यांचे ट्विट चर्चेत

शरद पवार आक्रमक, ‘या’ कारणांमुळे नरेंद्र मोदींना सुनावले खडे बोल