Top news नागपूर महाराष्ट्र

नागपुरात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची भर रस्त्यात तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ

fight e1649766783387

नागपूर | काॅलेजातील पोरट्यांच्या हाणामाऱ्या आतापर्यंत खूप पाहिल्या असतील. इगोवरून, पोरींवरून काॅलेजमध्ये राडे होतच असतात. अशातच आता नागपुरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तरुणींच्या दोन गटात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नागपूरच्या सिविल लाइन्स परिसरात असलेल्या हिस्लॉप कॉलेज जवळची ही घटना असल्याची माहिती मिळाली आहे.

समोर आलेल्या व्हिडीओनुसार काॅलेजमधील तरूणींमध्ये जोरदार राडा झाल्याचं दिसत आहे. भर उन्हाळ्यात वर्तळीच्या ठिकाणी तरूणींमध्ये तुंबऴ हाणामारी झाली. या हाणामारीमागील कारण अद्याप समोर आलं नाही.

एका गटातील तरूणी दुसऱ्या गटातील तरूणीला भर रस्त्यावर लोळूलोळू मारत असल्याचं दिसतंय. तरूणींचा हा फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडीओ पाहून आता अनेकांना व्हिडीओ काढण्याचा मोह आवरला नाही.

दर्शक म्हणून असलेल्या लोकांना या घटनेचा व्हिडीओ काढला आणि नंतर तो व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये पोरी एकमेकींच्या केसाला धरून खाली पाडताना दिसत आहेत. तर त्यांनी अश्लील भाषेचा देखील वापर केलाय.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

IPL 2022: हार्दिक पांड्या वादाच्या भोवऱ्यात! LIVE सामन्यात शमीला दिली शिवी; व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई-बुब्स-ब्रा’ पोस्टनंतर आता ‘लिंबाच्या शक्ती’ची पोस्ट चर्चेत!

“…हे असलं काही चालणार नाही”; सुशीलकुमार शिंदेंनी राज ठाकरेंना फटकारलं

“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत?”

शरद पवारांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…