“समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार”

अमरावती | सध्या अमरावतीमधील त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेवरून निषेध करण्यात येत आहे. या निषेधार्थ राज्यात शुक्रवारी मोर्चे काढण्यात आले. याचे पडसाद आता तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये आज बंद पुकारण्यात आला होता.

भाजपकडून पुकारण्यात आलेल्या या बंदचे आता हिंसक रुप पहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहे. सगळीकडे तणावपूर्ण वातवरण निर्माण झालं आहे. अशातच आता या बंदवरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावती बंदचे हिंसक रुप पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दिलीप वळसे पाटलांनी शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. यासोबत त्यांनी समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

आक्रमक झालेल्या आंदोलकांनी दुकानांची तोडफोड केली आहे. याशिवाय दगडफेकही करण्यात आली आहे. मालमत्तेचं नुकसान झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असं वळसे पाटलांनी म्हटलं.

अमरावतीतही परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. याविषयी भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे.

अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलही चौकाचौकात तैनात करण्यात आलं आहे. मात्र हा मोर्चा काही आटोक्यात येताना दिसत नाही.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखावी, असं आवाहन केलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरुन अमरावती बंदवरुन चुकीची अफवा किंवा फोटो शेअर करु नये, असं सांगितलं जात आहे. नागरिकांना सहकार्य करण्यास विनंती केली जात  आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  अमरावती बंदचे हिंसक रुप: आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

  ’50 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे असतील तर…’; संजय राऊत यांनी सूचवला पर्याय

  “शिवसेनेनं कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत”

  “महाराष्ट्रात दंगली करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…”

“आपण कॅशलेस नाही तर लेसकॅश अर्थव्यवस्था झालोत”