अमरावतीत कलम 144 लागू; तीन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय

अमरावती | त्रिपुरा येथे मुस्लीम समाजावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता देशातील काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात देखील दिसून येत आहे.

सध्या अमरावतीतील वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. त्रिपुरामधील घटनेनंतर आता अमरावतीमध्ये काही हिंदूत्ववादी संघटनांकडून बंद पुकारण्यात आला. त्रिपुरामधील घटनेमुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढले निघताना दिसतून येत आहे.

अशातच अमरावतीमध्ये बंदच्या वेळी हिंसक वळण लागल्याची माहिती समोर आली आहे. या बंदच्या वेळी काही निदर्शकांनी राडा केल्याचं दिसून आलं होतं. त्यानंंतर पोलिसांनी यावेळी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळाली आहे.

अमरावती शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने जमावबंदी लागू करण्यात आली आहे. प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दुपारी दोन वाजतापासून शहरात कलम 144 जमावबंदी लागू केली आहे. तीन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतल्याची माहिती दिली

राजकमल चौक परिसरात हिंसक घटना घडल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या कांड्याचा देखील वापर केला. त्यावेळी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी पाण्याचा मारा देखील केला आहे.

या आंदोलनावेळी आता भाजप आणि हिंदू्त्ववादी संघटनांनी पाकिस्तान विरूद्ध घोषणाबाजी केल्याचं देखील दिसून आलं होतं. त्यानंतर आंदोलन करणाऱ्यांनी काही दुकानांची तोडफोड केली आहे.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जनतेने शांतता राखावी, असं आवाहन केलं आहे.

अमरावतीतील हिंसक आंदोलनानंतर राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आलं आहे. त्यामुळे आता अमरावतीकरांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे.

मुस्लीम झगडा लावून देण्याचं काम केलं जातंय. अनेक राज्यात निवडणुका आलेल्या असल्याने हिंदू मुसलमानचा विलगीकरण करण्याकरता असं कृत्य करण्यात येत असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

अमरावती बंदचे हिंसक रुप पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दिलीप वळसे पाटलांनी शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. यासोबत त्यांनी समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अमरावती बंदचे हिंसक रुप: आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

  ’50 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे असतील तर…’; संजय राऊत यांनी सूचवला पर्याय

  “शिवसेनेनं कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत”

  “महाराष्ट्रात दंगली करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…”

“आपण कॅशलेस नाही तर लेसकॅश अर्थव्यवस्था झालोत”