मुंबईतील 60 वर्षे जुन्या ‘या’ वडापावची जोरदार चर्चा, पाहा व्हिडीओ

मुंबई| चमचमीत भेळ, वडापाव, पाणीपुरी, पावभाजी, मोमोज, पिझ्झा, बर्गर या पदार्थांची नावं घेताच तोंडाला पाणी सुटते. शहरात ठिकठिकाणी उभ्या असणाऱ्या अशा फास्ट फूडच्या गाड्या तर खवय्यांसाठी मेजवानीच ठरतात. यातच वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण. आपल्याला अनेक स्ट्रीट फूडचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात. पण आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो म्हणजे मुंबईतील बोरा बाजार रस्त्यावरून उडणारा वडापाव.

मुंबईत आपल्याला वडापाव खाणारे खवय्ये भरपूर प्रमाणात भेटतील. त्यामुळे जीेथे तीथे वडापावच्या गाड्या हमखास पहायला मिळतात. वडापाव बनवण्याची रेसिपी सारखीच असली तरी प्रत्येक ठिकाणची चव मात्र वेगवेगळी असते. ग्रील वडापाव, शेजवान वडापाव, चीज वडापाव अशा अनेक वडापावच्या व्हरायटी सध्या मिळतात, मात्र ‘फ्लाइंग वडापाव’ची चव कधी तुम्ही चाखलीय?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा ‘फ्लाइंग वडापाव’ चा असून प्रेक्षकांकडून या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया भेटत आहे.

फोर्टच्या बोरा बाझार येथील 64 वर्षे जुन्या रघू डोसावाला या खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर हा फ्लाइंड वडा पाहायला मिळतो. आमची मुंबई नावाच्या फूड ब्लॉगरने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो झपाटय़ाने व्हायरल झाला आहे. या रघु स्टॉलवर डोसा, इडली वडा, चीज मसाला वडा पाव असे विविध स्नॅक्स सर्व्ह केले जातात.

वडापाव बनवण्याच्या विक्रेत्याच्या अनोख्या शैलीमुळे याला नेटिझन्सने ‘फ्लाइंग वडा’ असे नाव दिले आहे. हा विक्रेता एका हाताने वडा हवेत उडवतो आणि दुसऱया हाताने त्याचा अचूक झेल घेतो. अवघ्या काही क्षणांमध्ये होणारा हा प्रकार खवय्यांना थक्क करणारा आहे.

व्हिडीओमध्ये शेफ तव्यातील पॅनमध्ये बटरचा संपूर्ण ब्लॉक घालून मसाला वडा पाव बनवताना दिसत आहे, मसाल्यात पाव तळून तो एका बाजूला लांब चमचा घेऊन हवेत वडा उडवताना दिसतो आणि दुस-या हाताने वडा पकडतो. त्याची वडापाव पकडण्याची कला अगदीच वाखाणण्याजोगी आहे.

त्यानंतर तो वडा मसाला पावासोबत कोबी, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, बीट आणि चीजसोबत ग्राहकांना सर्व्ह केला जातो. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

असे वेगवेगळे पदार्थ खायला आणि वेगवेगळ्या युक्या लढवत केलेल्या अनोख्या पद्धती नेहमीच लोकांच्या पसंतीस येत असतात.

महत्वाच्या बातम्या –

नियमित केळी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या! कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता पुणेकरांसाठी…

‘या’मुळे पोटच्या गोळयाने आईला घरात घेण्यास दिला…

‘या’ तीन अभिनेत्रींना किस करण्यास इम्रान…

जाणून घ्या! उन्हाळ्यात दही खाण्याचे ‘हे’ फायदे