नियमित केळी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

मुंबई| केळ सर्वांना आवडणारं एक फळ. केळी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात. केळात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात.

केळ खाण्याचे फायदे – 

1.  केळामध्ये उच्च फायबर असते. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

2. केळ हे शक्तीवर्धक फळ आहे पण त्याचबरोबर त्याचे अनेक फायदेही आहेत. केळी हे ब्यूटी प्रॉडक्ट सुद्धा आहे. दररोज एक केळी खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. व्हिटॅमिन, प्रोटिन आणि इतर पोषक तत्त्वांनी भरलेले हे फळ आहे.

3. केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.

4. केळीमध्ये अनेक गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्यांचे वजन कमी-अनुकूल आहारासाठी महत्वाचे असते. केळी मध्ये खूप कमी कॅलरी असतात परंतु फायबरचे प्रमाण अधिक असते. एक केळी मधुन एका दिवसाला आवश्यक असलेले 12 टक्के फायबर प्रदान होते. हे खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणात तृप्त होण्यास देखील मदत करते आणि जास्त प्रमाणात खाण्याची शक्यता कमी करते जेणेकरून आपल्या शरीराचे वजन कायम राखण्यास मदत होते व वजन संतुलित राहते.

5. केळी खाण्याने छान झोप लागते. पोटॅशियमयुक्त केळी थकलेल्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात.

6. केळी खाल्ल्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर महिलांना आराम मिळतो. तसेत मूड स्विंगवरही केळी फायदेशीर आहे.

7. अधिक मद्यपान केल्याने हँगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो.

8. केळीतील मॅंगनीज हे खनिज आपल्या त्वचेसाठी खूप लाभदायक आहे. एक साधारण आकाराचा केळ्याचा आहारात समाविष्ट केल्याने आपल्या सुमारे 12% मॅंगनीज मिळते. हे कोलेजेन तयार करण्यात आपल्या शरीरास मदत करते आणि आपल्या त्वचेला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करते. केळी निरोगी पेशी तयार करण्यात मदत करते.

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या! कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता पुणेकरांसाठी…

‘या’मुळे पोटच्या गोळयाने आईला घरात घेण्यास दिला…

‘या’ तीन अभिनेत्रींना किस करण्यास इम्रान…

जाणून घ्या! उन्हाळ्यात दही खाण्याचे ‘हे’ फायदे

OnePlus 9 आणि Oneplus 9 Pro जबरदस्त कॅमेरासह बाजारात, जाणून…